शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सपाप्रणीत आघाडी संजदने फेटाळली

By admin | Updated: September 19, 2015 02:29 IST

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीच्या नेतृत्वात स्थापित तिसऱ्या आघाडीचे अस्तित्व संयुक्त जनता दलाने फेटाळले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सोबतीने आमच्या

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीच्या नेतृत्वात स्थापित तिसऱ्या आघाडीचे अस्तित्व संयुक्त जनता दलाने फेटाळले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सोबतीने आमच्या पक्षाने तयार केलेली एकमेव आघाडी रिंगणात असल्याचा दावा संजदचे अध्यक्ष शरद यादव यांनी शुक्रवारी केला.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असून काँग्रेससोबत जागावाटपावर चर्चा पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच महाआघाडीत मतभेदाच्या वृत्ताचा इन्कार केला. महाआघाडीतून विभक्त झाल्यानंतर मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीने समाजवादी जनता दल-लोकशाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पी.ए.संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीसह तिसऱ्या आघाडीची घोषणा केली.नितीश, लालूंची दांडीकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या शनिवारी चंपारण जिल्ह्यात होणाऱ्या सभेला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव उपस्थित राहणार नाहीत. महाआघाडीचे हे नेते तिकीट वाटपात व्यस्त आहेत. यामागे कुठलेही राजकीय कारण शोधले जाऊ नये, असे संजदचे महासचिव के.सी. त्यागी यांनी सांगितले. नितीशकुमार यांनी अनुपस्थितीबाबत कुठलेही वक्तव्य केले नसले तरी महाआघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असून यादी १९ सप्टेंबरला जाहीर केली जाईल, असे टिष्ट्वट केले आहे. दरम्यान, राहुल यांच्या सभेला नितीशकुमार, लालूप्रसाद यांच्या अनुपस्थितीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली असतानाच या तिन्ही नेत्यांना लवकरात लवकर एका व्यासपीठावर आणून या चर्चेला पूर्णविराम देण्याची तयारी सुरू आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)