डास निर्मूलनासाठी फवारणीची मागणी
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
डास निर्मूलनासाठी फवारणीची मागणी
डास निर्मूलनासाठी फवारणीची मागणी
डास निर्मूलनासाठी फवारणीची मागणीखेडी (खरबडी) : स्थानिक परिसरात घाणीची समस्या असल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. डास निर्मूलनासाठी गावात फॉगिंग मशीनद्वारे धुरळणी व फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गावातील घाणीमुळे डासांची पैदास प्रचंड वाढली आहे. यामुळे चिकनगुनिया, डेंग्यू यासारख्या आजारांना ग्रामस्थ बळी पडत आहेत. दुसरीकडे परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भारनियमनामुळे विद्युत उपकरणे बंद असतात. अशावेळी लहानग्यांपासून वृद्धांनाही डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. परिसरात काळसर पांढरे रंगाचे डास दिसून येत आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश आजाराची भीती वर्तविली जात आहे. डासांचा बंदोबस्त लावण्यासाठी गावात फॉगिंग मशीनद्वारे धुरळणी व नाल्यांमध्ये औषधांची फवारणी करणे गरजेचे झाले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने गावातील नाल्यांची साफसफाई करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)