स्पोर्ट: जिल्हा स्तर शालेय कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST
अकोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हा स्तर शालेय कबड्डी जिल्हाक्षेत्र स्पर्धा १८ व १९ सप्टेंबर रोजी जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद (बार्शीटाकळी) येथे होणार आहेत. तसेच जिल्हाक्षेत्र बुद्धिबळ स्पर्धा १९ व २० सप्टेंबर रोजी शिवाजी विद्यालय तेल्हारा येथे घेण्यात येईल. जिल्हा स्तर महानगरपालिका क्षेत्र बुद्धिबळ स्पर्धा १५, १६, १७ सप्टेंबर रोजी वसंत देसाई क्रीडांगण येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई क्रीडांगण येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले. (क्रीडा प्रतिनिधी)
स्पोर्ट: जिल्हा स्तर शालेय कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा
अकोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हा स्तर शालेय कबड्डी जिल्हाक्षेत्र स्पर्धा १८ व १९ सप्टेंबर रोजी जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद (बार्शीटाकळी) येथे होणार आहेत. तसेच जिल्हाक्षेत्र बुद्धिबळ स्पर्धा १९ व २० सप्टेंबर रोजी शिवाजी विद्यालय तेल्हारा येथे घेण्यात येईल. जिल्हा स्तर महानगरपालिका क्षेत्र बुद्धिबळ स्पर्धा १५, १६, १७ सप्टेंबर रोजी वसंत देसाई क्रीडांगण येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई क्रीडांगण येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले. (क्रीडा प्रतिनिधी)...