पाणीबाणी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
- साबांखाचे कंत्राटी कामगार रस्त्यावर; मागण्या मान्य न झाल्यास मोर्चाचा इशारा
पाणीबाणी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- साबांखाचे कंत्राटी कामगार रस्त्यावर; मागण्या मान्य न झाल्यास मोर्चाचा इशारापणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचार्यांनी केलेल्या पाणीबाणी आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद लाभला. प्रत्येक तालुक्यातील विविध संघटना, संस्थांनी कामगारांच्या मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. विधानसभा अधिवेशनात कामगारांच्या समस्येवर तोडगा काढण्यात आला नाही तर विधानसभेनंतर पणजीत मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा कामगार नेते अजितसिंग राणे यांनी दिला.राज्यभर पाणीबाणी आंदोलन केल्यानंतर अजितसिंग राणे आणि कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेतली. तालुक्यातील कामगारांनी विविध ठिकाणी रॅली, नारे देऊन आंदोलन केले. काही ठिकाणी धरणे, सभा घेऊनही आंदोलन केले. खाणग्रस्त भागातील ट्रकचालक, शेतकरी संघटना व नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. कमी वेतनावर काम करून घेणार्या कामगारांवर सरकार अन्याय करत असून कामगारांना 10 हजार रुपये वेतन देणेच योग्य आहे, असा सूर नागरिकांतही उमटला. राज्यभर आंदोलन करताना कोणताही सरकारी प्रतिनिधी किंवा विरोधी प्रतिनिधींनी आम्हाला सहकार्य किंवा पाठिंबा दिला नाही. विधानसभेत कामगारांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार न केल्यास सोसायटीचे 2,300 आणि कंत्राटी तत्त्वावर काम करणारे 750 कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशारा राणे यांनी दिला. (प्रतिनिधी)..चौकट..क्रीडा कर्मचार्यांचेही उपोषणदरम्यान, क्रीडा खात्याने कंत्राटी तत्त्वावरील 145 कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी करत वास्को येथील क्रीडा कर्मचारी शेवेरिटो डिकॉस्ता हा आजपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहे. क्रीडा खात्याने एक महिन्याचा ब्रेक दिल्यानंतर पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे आश्वासन देऊन कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले होते. मात्र, 10 महिने उलटले तरी त्यांना पुन्हा कामावर घेण्याबाबत विचारच केला जात नाही. क्रीडा खात्याचे काही कर्मचारी डिकॉस्तासोबत साखळी उपोषणाला बसतील, अशी माहिती अजितसिंग राणे यांनी दिली.