शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरीने राष्ट्रहितही धोक्यात

By admin | Updated: February 22, 2015 01:43 IST

तेल मंत्रालयातील खळबळजनक कॉर्पोरेट हेरगिरीप्रकरणी जप्त करण्यात आलेले दस्तऐवज राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून आरोपींनी राष्ट्रहिताशी तडजोड केली आहे.

नवी दिल्ली : तेल मंत्रालयातील खळबळजनक कॉर्पोरेट हेरगिरीप्रकरणी जप्त करण्यात आलेले दस्तऐवज राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून आरोपींनी राष्ट्रहिताशी तडजोड केली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या ५ कॉर्पोरेट अधिकाऱ्यांसह १२ आरोपींवर शासकीय गोपनीयता कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, असा दावा दिल्ली पोलिसांनी शनिवारी स्थानिक न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने अटकेतील पाच कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या हेरगिरी प्रकरणाच्या तपासाला गती देत अटकेत असलेला ऊर्जा सल्लागार प्रयास जैन याच्या कार्यालयाची झडती घेतल्यानंतर नोएडामधील एका पेट्रोकेमिकल कंपनीच्या कार्यालयावरही शनिवारी धाड घातली.पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेल्या पाच कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी संजय खनगवाल यांच्यासमक्ष हजर करून त्यांची कसून चौकशी करण्याच्या दृष्टीने पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली. या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या चौकशीसाठी संबंधित मंत्रालयांशीही संपर्क करावा लागणार आहे. समोरासमोर बसवून जाबजबाबासाठी त्यांची कोठडी मिळणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.