शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

संसदेतील कॅन्टीनच्या जेवणात आढळला कोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 11:45 IST

कमी पैशांमध्ये चविष्ठ जेवणासाठी संसदेचं कॅन्टीन ओळखले जाते. मात्र मंगळवारी एका वरिष्ठ अधिका-याच्या जेवणाच्या ताटात कोळी आढळून आल्यानं कॅन्टीनमधील स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 -  कमी पैशांमध्ये चविष्ठ जेवणासाठी संसदेचं कॅन्टीन ओळखले जाते. मात्र मंगळवारी एका वरिष्ठ अधिका-याच्या जेवणाच्या ताटात कोळी आढळून आल्यानं कॅन्टीनमधील स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे संसदेचं कॅन्टीन जेवणावरुन वादात आले आहे.  श्रीनिवासन असे या अधिका-याचे नाव आहे.  यानंतर त्यांची प्रकृतीही बिघडली आहे, अशी माहिती समोर आली आहे.  
 
याप्रकरणी श्रीनिवासन यांनी संसदेच्या अन्न व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ए.पी. जितेंद्र रेड्डी यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. शिवाय, संसदीय व्यवहार राज्यमंत्री एस.एस अहलुवालिया यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. रेड्डी यांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्यास सांगितले आहे.  श्रीनिवासन यांनी संसदेच्या कॅन्टीनमधून पोंगल आणि दही भाताची ऑर्डर दिली होती. हे पदार्थ खात असताना श्रीनिवासन यांना जेवणात कोळी सापडला.
 
विशेष म्हणजे, संसदेच्या कॅन्टीनमध्ये दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खासदारांसोबत जेवण केले होते. त्यामुळे ज्या कॅन्टीनमध्ये खासदारांसह पंतप्रधान जेवण करतात, त्याच कॅन्टीनच्या जेवणात कोळी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संसदेच्या कॅन्टीनमधील स्वच्छता व जेवणाच्या दर्जेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
आणखी बातम्या वाचा