शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनने वाढली पर्यटनाची गती

By admin | Updated: April 27, 2016 04:58 IST

यावर्षीच्या सुट्ट्यांतील पर्यटनाचे सर्वाधिक बुकिंग हे मोबाईलच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : देशात स्मार्टफोनच्या झपाट्याने होणाऱ्या विस्ताराचे अनेक फायदे आता समोर येत असून उपलब्ध माहितीनुसार यावर्षीच्या सुट्ट्यांतील पर्यटनाचे सर्वाधिक बुकिंग हे मोबाईलच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून आले आहे. पर्यटन विषयात काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतातील पर्यटनासंदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, २०१५ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी पर्यटनाची जी बुकिंग झाली आहे, त्यामध्ये मोबाईलवरून होणाऱ्या बुकिंगच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.५ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या सुट्टीच्या हंगामाकरिता जी एकूण बुकिंग झाली आहे, त्यापैकी ६७ टक्के बुकिंग ही आॅनलाईन झाली असून उर्वरित ३३ टक्के बुकिंग प्रत्यक्ष ट्रॅव्हल कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन लोकांनी केली आहे. पर्यटनाची सेवा देणाऱ्या आॅनलाईन कंपन्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, या कंपन्यांतील स्पर्धेमुळे ग्राहकांना अधिकाधिक आकर्षक आॅफर्स मिळत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच ग्राहकांना याचा फायदा होत आहे. इंटरनेटवरून होणाऱ्या बुकिंगचे वाढते प्रमाण आणि डेस्कटॉप अथवा लॅपटॉप किंवा टॅब्लेटच्या तुलनेत मोबाईलवरून वाढलेला इंटरनेटचा वापर लक्षात घेत, आता पर्यटन कंपन्यांनी आपले अ‍ॅप्स सादर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून अधिकाधिक जोमाने जाहिरातबाजी होत असून यामुळेच मोबाईलवरून होणारे बुकिंग वाढल्याचे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहे. (प्रतिनिधी)>वित्तीय व्यवहारांची विक्रमी कामगिरी४केवळ विविध सेवांच्या वापरासाठी स्मार्टफोनचा वापर वाढत नसून मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या वित्तीय व्यवहारांनीही विक्रमी कामगिरी केली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षात मोबाईल बँकिंगच्या वापरात ४६ टक्क्यांची वाढ नोंदवीत गेल्या आर्थिक वर्षात ५२ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.४ मोबाईलमुळे होणारे बँकिंग अथवा मोबाईल वॅलेटच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दैनंदिन सुविधेच्या अनेक आस्थापनांची आता मोबाईलशी जोडणी झाली आहे. या माध्यमाला प्रमोट करण्यासाठी या कंपन्याही अधिकाधिक सूट योजना राबवीत आहेत. याचाच फायदा मोबाईलवरून होणाऱ्या वित्तीय व्यवहारांची संख्या वाढण्यात झाला आहे.>दूरध्वनी ग्राहकांची संख्या पोहोचली १०५ कोटीवरदेशामध्ये फोनसेवेचा विस्तार झपाट्याने होत असून फोन ग्राहकांच्या संख्येने १०५ कोटी १८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी वायरलेस फोनचा वाटा लक्षणीय आहे. यामध्ये ०.८५ टक्के वाढ झाली असून आता ही ग्राहक संख्या १०१ कोटी ७९ लाखांवरून १०२ कोटी ६६ लाखांवर पोहोचली आहे. जानेवारी २०१६ पर्यंतची ही आकडेवारी आहे. तर वायरलाईन ग्राहकांच्या संख्येत दोन कोटी ५३ लाखांवरून दोन कोटी ५२ लाख अशी एक लाखाची घट झाली आहे.