शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हायस्पीड रेल्वेचा वेग ताशी ३५० किलोमीटर

By admin | Updated: December 20, 2015 22:56 IST

भारत आणि जपान यांच्या सहकार्याने तयार होणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेमार्गाच्या बांधकामाला २०१७ पासून प्रारंभ होईल

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्या सहकार्याने तयार होणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेमार्गाच्या बांधकामाला २०१७ पासून प्रारंभ होईल आणि २०२३ च्या प्रारंभी देशाची पहिली बुलेट ट्रेन धावताना दिसण्याची शक्यता आहे. या रेल्वेचा कमाल वेग ताशी ३५० कि. मी. असेल.जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या भारत दौऱ्यात उभय देशांमध्ये झालेल्या करारानुसार या ५०८ कि. मी. लांबीचा हायस्पीड रेल्वेमार्ग, स्थानके आणि अन्य सुविधांचे निर्माणकार्य पाच वर्षांत पूर्ण केले जाईल. त्याशिवाय एक ते दीड वर्षे पूर्वतयारीसाठी लागतील, असे रेल्वे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.करारानुसार मुंबईच्या बांद्रा-कुर्ला संकुलात रेल्वेस्थानक बनविले जाईल. ही बुलेट ट्रेन या स्थानकावरून भुयारी मार्गाने महानगराबाहेर निघेल आणि काही उंचीवर बांधलेल्या रेल्वेमार्गाने धावत अहमदाबाद येथे पोहोचेल. तेथे अहमदाबाद हेच मुख्य स्थानक असेल, जेथे प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या रेल्वेगाड्या पकडता येतील. साबरमती येथे गाडीचे यार्ड तयार केले जाईल आणि रेल्वेमार्ग शहरी भागांतील पुलांवरून जाईल.प्रारंभी जपानहून १० ते १२ रँक मागविण्यात येतील आणि नंतर मेक इन इंडियांतर्गत त्यांची संख्या वाढविण्यात येईल. प्रारंभी हे रँक १० डब्यांचे असतील आणि त्यात ७५० प्रवासी बसू शकतील. त्यानंतर १६ डब्यांचे रँक चालविण्यात येतील. हे रँक मेट्रोच्या धर्तीवर इलेक्ट्रिक मल्टिपल युनिटसारखेच असतील आणि ते अवघ्या काही सेकंदातच पूर्ण वेग पकडतील. या रेल्वेमार्गाचा किमान २७ कि.मी.चा भाग सुरुंगाचा, १२२ कि.मी.चा भाग पुलांचा आणि उर्वरित भाग जमिनीवर राहील. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भडोच, बडोदा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी एकूण १२ रेल्वेस्थानके असतील.