शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच धावणार तात्काळ विशेष रेल्वे

By admin | Updated: May 10, 2015 23:55 IST

अनेक वेळा अचानक प्रवास करण्याची गरज पडते किंवा गर्दीच्या हंगामात रेल्वेचे तिकीट मिळत नाही. मात्र, लवकरच या समस्येतून रेल्वे प्रवाशांची सुटका होऊ शकते.

नवी दिल्ली : अनेक वेळा अचानक प्रवास करण्याची गरज पडते किंवा गर्दीच्या हंगामात रेल्वेचे तिकीट मिळत नाही. मात्र, लवकरच या समस्येतून रेल्वे प्रवाशांची सुटका होऊ शकते. भारतीय रेल्वे लवकरच आपली ‘तात्काळ विशेष’ रेल्वे सुरू करणार आहे. तथापि, ही रेल्वे गर्दीच्या हंगामात चालविली जाणार असून यासाठी प्रवाशांच्या खिशाला काहीशी अधिक कात्री लागू शकते. रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आर्थिक संकटाचा सामना करणारा रेल्वे विभाग काही वर्दळीच्या मार्गांवर तात्काळचे शुल्क आकारून अशा विशेष गाड्या चालविणार आहे. या नव्या तात्काळ रेल्वे सुरू झाल्याने गर्दीच्या वेळी प्रवाशांना अतिरिक्त सेवा मिळतील. तात्काळ रेल्वेसाठी प्रवाशांनी नियमित भाड्याहून अधिक शुल्क द्यावे लागेल आणि ते १७५ ते ४०० रुपये यादरम्यान असेल. सध्या प्रिमिअम आणि दुरंतोसारख्या रेल्वेसाठी प्रवासभाड्यात बदल केलेला आहे. प्रिमिअम गाड्यांसाठी केवळ आॅनलाईन बुकिंग केली जाते. तत्काळ स्पेशलसाठी मात्र आॅनलाईन आणि काऊंटर अशा दोन्ही ठिकाणी तिकिटे उपलब्ध राहतील. सध्या द्वितीय श्रेणीसाठी तत्काळ प्रवासभाडे मूळ प्रवासदराच्या १० टक्के तर एसीसह अन्य सर्व श्रेणींसाठी ३० टक्के आकारले जाते. प्रीमियम रेल्वेसाठी केवळ आॅनलाईन प्रणालीद्वारे तिकीट बुक केले जाऊ शकते. मात्र, तात्काळ विशेष रेल्वेसाठी तिकीट आॅनलाईन आणि काऊंटर या दोन्ही पद्धतींनी उपलब्ध होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)पूर्वआरक्षणासाठी दिलासातात्काळ रेल्वेत पूर्वआरक्षणासाठीही मंत्रालयनाने काहीसा दिलासा दिला आहे. सध्या कोणत्याही रेल्वेत तात्काळ तिकीट केवळ २४ तासांपूर्वी आरक्षित केले जाऊ शकते. मात्र, या तात्काळ विशेष रेल्वेत कमीत कमी १० दिवस आणि अधिकाधिक ६० दिवसांपूर्वी आरक्षण केले जाऊ शकते.