शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

GST लागू करताना संसदेत 30 जूनच्या मध्यरात्री विशेष कार्यक्रम

By admin | Updated: June 20, 2017 14:38 IST

स्वातंत्र्यानंतरची देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असलेल्या जीएसटीची येत्या 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्याचे सरकारने निश्चित केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 20 - स्वातंत्र्यानंतरची देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असलेल्या जीएसटीची येत्या 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्यासाठी 30 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम होणार आहे. संसदेचे सर्व खासदार, जीएसटी परिषदेचे सदस्य, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी वर्गाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याची माहिती जेटलींनी दिली. 
 
30 जूनच्या मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी लागू होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपरराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनही या कार्यक्रमाला उपस्थित असतील. 
 
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एचडी देवेगौडा यावेळी मंचावर उपस्थित असतील. तासाभराच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मार्गदर्शन करतील. जीएसटी संदर्भात दोन लघुपट यावेळी दाखवण्यात येतील. 
 
आणखी वाचा 
 
 
बिग बी जीएसटीचे नवे ब्रँड अॅम्बेसिडर
जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराच्या प्रमोशनसाठी अर्थ मंत्रालयाने अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसिडर  म्हणून निवड केली आहे. 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे त्याआधी लोकांपर्यंत जीएसटी नेमकं काय आहे, त्याचे फायदे काय या सगळ्या गोष्टी पोहचविण्यासाठी बिग बींची निवड करण्यात आली आहे. यासाठी खास तयार केलेला ४० सेकंदाचा व्हिडिओ अर्थ मंत्रालयाने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
 
 40 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन जीएसटीचं महत्त्व सांगत आहेत तसंच जीएसटीचं महत्त्व सांगताना ते भारताच्या तिरंग्याचा दाखला देत आहेत. भारताच्या झेंड्यावर असणारे तीन रंग हे आपल्याला एकत्र बांधून ठेवतात त्याचप्रमाणे, जीएसटीमुळेही एक राष्ट्र, एक कर आणि एक बाजारपेठ होणार असल्याचं या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलं आहे.  येत्या १ जुलैपासून जकात, सेवा कर, व्हॅट यासारख्या केंद्र आणि राज्यातील विविध करांच्या जागी फक्त जीएसटी हा एकच कर लागू होईल. याआधी जीएसटीसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची निवड करण्यात आली होती