शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महिला खासदारांसाठी विशेष तास

By admin | Updated: March 8, 2016 03:29 IST

आज मंगळवारी संसदेचा संपूर्ण एक तास पूर्णपणे महिला खासदारांसाठी समर्पित करता यावा, यासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे पीठासीन अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत

हरीश गुप्ता,  नवी दिल्ली आज मंगळवारी संसदेचा संपूर्ण एक तास पूर्णपणे महिला खासदारांसाठी समर्पित करता यावा, यासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे पीठासीन अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. महिला खासदारांसाठी अधिवेशनाचा एक दिवस समर्पित करण्यात आला पाहिजे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना केली होती. त्यांची ही सूचना प्रत्यक्ष अंमलात आणण्याच्या दिशेने आता प्रयत्न केले जात आहेत.‘यावर मार्ग काढा आणि महिलांना विशेष वेळ द्या,’ अशी विनंती संसदीय कामकाज मंत्रालयाने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हमीद अंसारी यांच्याकडे केलेली आहे. लोकसभेत किमान ६५ आणि राज्यसभेत ३१ महिला खासदार आहेत. ही संख्या संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील सदस्य संख्येच्या १२ टक्के आहे. तथापि, प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उत्तरे देण्यासाठी ज्या खासदारांचे प्रश्न अगोदरच सूचीबद्ध करण्यात आले आहेत, त्या खासदारांच्या जागी आता महिला खासदारांचे प्रश्न घेणे ही खरी समस्या आहे. दुसरे असे की, शून्य तासासाठीदेखील महिला खासदारांना पीठासीन अधिकाऱ्यांकडे आगाऊ नोटीस द्यावी लागणार आहे. शून्य तासादरम्यान बोलण्यासाठी अगोदरच नोटीस देणाऱ्या खासदारांना बोलण्याची परवानगी नाकारण्याची, पीठासीन अधिकाऱ्यांना अनुमती देणारा असा कोणताही नियम नाही. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना ‘लोकमत’ने यावर प्रश्न केला असता, ते म्हणाले, ‘आम्ही अद्याप यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.’