पासपोर्ट प्रकरण निपटाऱ्या संबंधी विशेष अभियान
By admin | Updated: July 26, 2015 23:38 IST
नागपूर : पासपोर्ट संबंधीच्या त्रुटी दूर करून त्यांची प्रकरणे ठाण्यातच मार्गी लावण्यासंदर्भात परिमंडळ एकमधील सहा पोलीस ठाण्यात विशेष अभियान राबविले जाणार आहे. २७ ते २९ जुलै या तीन दिवसात हे अभियान आयोजित करण्यात आले आहेसीताबर्डी, अंबाझरी, प्रतापनगर, सोनेगाव, वाडी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात पासपोर्ट संदर्भातील तक्रारीबाबत २७ ...
पासपोर्ट प्रकरण निपटाऱ्या संबंधी विशेष अभियान
नागपूर : पासपोर्ट संबंधीच्या त्रुटी दूर करून त्यांची प्रकरणे ठाण्यातच मार्गी लावण्यासंदर्भात परिमंडळ एकमधील सहा पोलीस ठाण्यात विशेष अभियान राबविले जाणार आहे. २७ ते २९ जुलै या तीन दिवसात हे अभियान आयोजित करण्यात आले आहेसीताबर्डी, अंबाझरी, प्रतापनगर, सोनेगाव, वाडी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात पासपोर्ट संदर्भातील तक्रारीबाबत २७ ते २९ जुलै या तीन दिवसात विशेष अभियान राबविले जाणार आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी पासपोर्ट संदर्भातील तक्रारीबाबत उपरोक्त तीन दिवसात सोयीप्रमाणे हजर राहून आपली त्रुटी दूर करून घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.--