शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाण खटल्यांसाठी दिल्लीत विशेष न्यायालय

By admin | Updated: July 18, 2014 23:16 IST

कोळसा खाणपट्टे वाटप गैरव्यवहारांशी संबंधित तपास पूर्ण झालेल्या सर्व प्रकरणांचे खटले चालविण्यासाठी दिल्लीत एक विशेष न्यायालय स्थापन केले

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटप गैरव्यवहारांशी संबंधित तपास पूर्ण झालेल्या सर्व प्रकरणांचे खटले चालविण्यासाठी दिल्लीत एक विशेष न्यायालय स्थापन केले जावे आणि या न्यायालयावरील न्यायाधीशाची नेमणूक एक आठवड्यात केली जावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.कोळसा खाटपट्टे वाटप गैरव्यवहारांच्या संदर्भात केंद्रीय गुप्तचर संस्था (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांनी भारतीय दंड विधान, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, काळा पैसा प्रतिबंधक कायदा (मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट) व अन्य कायद्यांन्वये दाखल केलेल्या सर्व खटल्यांची सुनावणी या न्यायालयात होईल, असेही सरन्यायाधीश न्या. राजेंद्र मल लोढा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा आदेश देताना स्पष्ट केले. न्या. मदन लोकुर व न्या. कुरियन जोसेफ हे या खंडपीठावरील इतर दोन न्यायाधीश आहेत. या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या महाप्रबंधकांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या महाप्रबंधकांना पत्र लिहून हा आदेश कळवायचा असून त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून उचित निर्देश घेऊन त्याची माहिती सर्वोच्च न्यायालयास २५ जुलैपूर्वी कळवायची आहे. शुक्रवारी झालेल्या सुमारे दोन तासांच्या सुनावणीत प्रामुख्याने हे खटले चालविण्यासाठी एखाद्या अग्रगण्य वकिलाची विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक करण्यावर बरीच चर्चा झाली. वादातीत सचोटी आणि नि:पक्षतेने स्वत:चे कायदेशीर मत ठामपणे मांडू शकणारी व्यक्ती आम्हाला विश्ेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून हवी आहे, असे खंडपीठाने आग्रहपूर्वक नमूद केले व त्यासाठी माजी सॉलिसिटर जनरल गोपाळ सुब्रमणियम यांच्या नावाला पहिली पसंती दिली. विविध पक्षकारांच्या वकिलांनीही सुब्रमणियम यांच्या नावास संमती दर्शविली तेव्हा त्यांनी सुब्रमणियम यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करावा, असे सरन्यायाधीशंनी सुचविले. मात्र विशेष पब्लिक प्रॉसिक्युटरला आरोपपत्र दाखल करण्याआधी तपासाची कागदपत्रे अभ्यासण्याचा अधिकार असावा की नाही, यावर बरीच गरमागरमी झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)