शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सपाला मजबुती, काँग्रेसला संजीवनी

By admin | Updated: January 24, 2017 00:51 IST

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी व काँग्रेस पक्षाने अनुक्रमे २९८ व १0५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाल्यानंतर

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीउत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी व काँग्रेस पक्षाने अनुक्रमे २९८ व १0५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाल्यानंतर उभय पक्षांनी २0१९ ची लोकसभा निवडणूक देखील निवडणूकपूर्व आघाडी करूनच लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय वर्तुळात या आघाडीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी उभय पक्षांना काही बाबतीत आघाडीचा लाभ तर काही तोटेही सहन करावे लागणार आहेत.समाजवादी पक्षाची सारी सूत्रे अखिलेश यादवांच्या हाती आहेत. प्रियंका व राहुल गांधींची त्यांना साथ मिळाल्याने आघाडीच्या प्रचारमोहिमेत तरूण पिढीचा जोश दिसेल, इतकेच नव्हे तर सवर्ण मतदारांची बरीच मतेही यंदा आघाडीच्या बाजूने वळतील, अशी अपेक्षा आहे. राज्यात कौटुंबिक कलहामुळे काहीशी वादग्रस्त व कमजोर झालेली समाजवादी पक्षाची प्रतिमा काँग्रेसबरोबर समझोता झाल्याने पुन्हा मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाला मिळणारी मुस्लिम मते फुटण्याची शक्यता आता बरीच कमी झाली आहे. उभय पक्षांच्या आघाडीमुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसला तर हमखास संजीवनी मिळणार आहे. पक्षाच्या विधानसभेतील जागा वाढण्याची शक्यता असून दूर गेलेली मुस्लीम मतेही पुन्हा काँग्रेसच्या दिशेने वळतील. अर्थात समाजवादी पक्षाला त्याचा काही प्रमाणात तोटा होईल व काँग्रेसला दीर्घकालिन लाभ होईल.