शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण कोरिया देणार भारताला १० अब्ज डॉलर

By admin | Updated: May 18, 2015 23:52 IST

भारतातील पायाभूत क्षेत्राचा विकास, स्मार्ट शहरे, रेल्वे, विद्युतनिर्मिती यासह विविध क्षेत्रांच्या विकासासाठी भारत व दक्षिण कोरिया यांनी परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला

पायाभूत विकासासाठी सहकार्य : पंतप्रधानांचा तीन देशांचा दौरा अखेरच्या टप्प्यातसेऊल : भारतातील पायाभूत क्षेत्राचा विकास, स्मार्ट शहरे, रेल्वे, विद्युतनिर्मिती यासह विविध क्षेत्रांच्या विकासासाठी भारत व दक्षिण कोरिया यांनी परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला असून, दक्षिण कोरियाने भारताला १० अब्ज डॉलर देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने दक्षिण कोरियात आले आहेत. मोदी व दक्षिण कोरियाच्या अध्यक्ष पार्क ग्यून ह्ये यांनी विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. परस्पर संबंध वरच्या पातळीवर नेण्यासाठी संरक्षण, व्यापार व गुंतवणूक हे मुद्दे आधीच्या सहकार्यात मिळवण्याचा निर्णय या दोन नेत्यांनी घेतला आहे. अध्यक्ष पार्क व पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी दक्षिण कोरियाच्या प्रगतीची प्रशंसा केली. दक्षिण कोरियाच्या जलद विकासामुळे आशियायी शतक अधिक बळकट झाल्याचे मोदी यांनी सांगितले. ३ राष्ट्रांच्या दौऱ्यात मोदी आता अखेरच्या टप्प्यात आहेत. भारत व दक्षिण कोरिया यांच्यात सात करार झाले असून, त्यात दुहेरी कर टाळण्याचा डीटीएए हा करारही करण्यात आला आहे. अध्यक्ष पार्क व पंतप्रधान मोदी यांच्या वाटाघाटीनंतर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून, दक्षिण कोरिया हा भारताच्या अ‍ॅक्ट इस्ट मोहिमेतील अत्यावश्यक भागीदार आहे अशी नोंद यात करण्यात आली आहे. भारताच्या सर्व समस्यांवरील उपाय म्हणजे विकास असून, देशातील सव्वाशे कोटी लोकांना जोडून घेणे अत्यंत कठीण काम आहे; पण मी लोण्यावर रेघ ओढणाऱ्यांपैकी नाही, तर मला दगडावर रेघ ओढण्याची सवय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सेऊल येथील क्यूंग विद्यापीठात ते भारतीय समुदायासमोर बोलत होते.