शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोरींवरील अ‍ॅसिड हल्ला घडवून आणलेले नाटक

By admin | Updated: February 29, 2016 03:04 IST

आदिवासी हक्क कार्यकर्त्या सोनी सोरी यांच्यावरील अ‍ॅसिड हल्ला हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या वेळी सनसनाटी निर्माण करण्यासाठी मुद्दाम घडवून आणलेले नाटक आहे

रायपूर : आदिवासी हक्क कार्यकर्त्या सोनी सोरी यांच्यावरील अ‍ॅसिड हल्ला हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या वेळी सनसनाटी निर्माण करण्यासाठी मुद्दाम घडवून आणलेले नाटक आहे, या जिल्हाधिकारी अमित कटारिया यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.सोरींवरील हल्ला केवळ एक नाटक होते, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर हे माझे वैयक्तिक मत असल्याचेही कटारिया यांनी रविवारी स्पष्ट केले.ही वादग्रस्त पोस्ट मुळात आयआयटी कानपूर येथे शिकलेले आणि पंतप्रधान ग्रामविकास कार्यक्रमाचे अरीब अहमद यांनी लिहिली होती. सोरी प्रकरणाच्या तपासाशी संबंधित गोपनीय कागद अरीब यांच्याकडे कसे पोहोचले, असे विचारले असता जिल्हाधिकारी कटारिया समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. अरीब यांनी लिहिलेली पोस्ट कटारिया यांनी शुक्रवारी रात्री शेअर केली होती. याला ६०० पेक्षा अधिक लाईक व ४३ वर कॉमेंट आल्या होत्या. बाहेरचे लोक बस्तरबाबत खोट्या बातम्या पेरत असल्याचे यात म्हटले होते. सोरी यांच्यावरील हल्ला आश्चर्यकारक आहे. कारण हल्ला होतो ना होतो, तोच त्याची माहिती मीडियाकडे पोहोचली. सोरींवर ज्या दिवशी हल्ला झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान छत्तीसगडच्या दौऱ्यावर येणार होते. अशा स्थितीत ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित वाटते, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.यापूर्वी गॉगल लावून पंतप्रधान मोदींचे स्वागत करून प्रोटोकॉलचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी कटारिया चर्चेत आले होते.