शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

भूसंपादन विरोधाची सूत्रे राहुल गांधींकडे

By admin | Updated: March 31, 2015 02:23 IST

बहुचर्चित भूसंपादन विधेयकाला संसदेत तीव्र विरोध सुरू असताना परदेशी सुटीवर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशात परतताच जनतेच्या दरबारात या

नबीन सिन्हा, नवी दिल्लीबहुचर्चित भूसंपादन विधेयकाला संसदेत तीव्र विरोध सुरू असताना परदेशी सुटीवर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशात परतताच जनतेच्या दरबारात या विधेयकाविरोधी लढाईचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविले जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून १९ एप्रिलला दिल्लीत भूसंपादन विधेयकाविरुद्ध ‘महा किसान रॅली’चे आयोजन काँग्रेसने केले आहे. खा. राहुल त्यापूर्वी बहुचर्चित सुटी संपवून भारतात परतून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. या निमित्ताने आक्रमक झालेल्या काँग्रेसने जनाधार वाढविण्याच्या उद्देशाने सोमवारी आॅनलाईन आणि अ‍ॅप आधारित सदस्यनोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि त्यांची पत्नी गुरशरण कौर यांनी नवी दिल्लीतील निवासस्थानी या अप्लिकेशनची सुरुवात केली. राहुल गांधी यांनी ‘आत्मचिंतना’साठी २२ फेब्रुवारीपासून सुटी घेतली असून त्यांच्या ठावठिकाण्याबाबतही तर्कवितर्क केले जात होते. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी ते देशात आहेत की विदेशात, ते सांगण्याचे टाळले होते. राहुल यांच्या अनुपस्थितीत संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच भूसंपादन विधेयकाविरुद्धच्या आंदोलनाची धुरा सांभाळली. या महिन्याच्या प्रारंभी १४ पक्षांची एकजूट करीत त्यांनी राष्ट्रपती भवनावर ‘निषेध मार्च’ नेत राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. हरियाणा आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांना भेटून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावाही घेतला. तथापि राहुल मायदेशी परतताच सूत्रे त्यांच्याकडे दिली जाण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. काँग्रेसच्या मुख्यालयात सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी एकसूरात राहुल गांधी लवकरच परतणार असे संकेत दिले; मात्र तारखेबाबत मौन पाळले. राहुल यांच्या उपस्थितीची खातरजमा केल्यानंतरच रॅलीची तारीख निश्चित केल्याचे समजते. माजी संरक्षण मंत्री ए.के. अ‍ॅन्टोनी यांच्या अध्यक्षतेत काँग्रेसच्या सरचिटणींसासह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तसे संकेत देण्यात आले. अ‍ॅन्टोनी हे राहुल गांधी यांचे निकटस्थ आणि त्यांचे ‘राजकीय गुरू’ही मानले जातात. संसदेचे अधिवेशन एक महिन्याच्या अवकाशानंतर २० एप्रिलला सुरू होत असून, त्याच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली महारॅलीने दणाणून जाईल.