सोनीचा कॅसिनोशी संबंध
By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST
- पोलिसांचा न्यायालयात दावा
सोनीचा कॅसिनोशी संबंध
- पोलिसांचा न्यायालयात दावापणजी : जैका लाच प्रकरणात अटक करण्यात आलेला हवाला एजंट रायचंद सोनी याचा गोव्यातील कॅसिनोंशी संबंध असल्याचे क्राईम ब्रँचने म्हटले आहे. यापूर्वी हवाला प्रकरणात येरवडा तुरुंगातही त्याला टाकण्यात आल्याचे क्राईम ब्रँचचे वकील जी. डी. कीर्तनी यांनी पणजी विशेष न्यायालयापुढे नमूद केले.सोनी हा जैका प्रकरणात पोलिसांना उपयोगी पडू शकणारा महत्त्वाचा साक्षीदार असला, तरी त्याच्या जामिनासाठी पोलिसांनी विरोध केला आहे. हवालाद्वारे काळ्या पैशांचा धंदा करीत असल्याचा तसेच गोव्यातील कॅसिनोंशी त्याचा संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. लाचेचे पैसे ज्या माणसाने दिल्लीहून गोव्यात आणले होते आणि आपल्या मुकेश भारती नामक कर्मचार्याकडून लुईस बर्जर कंपनीच्या अधिकार्यांना उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याची सोनीकडून पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात नोंदविलेल्या जबाबात कबुलीही दिली आहे.हे पैसे आपण दिले असल्याचे सोनीने मान्य केले असले, तरी ते हवालातून आणलेले पैसे नसून आपल्या खात्यातून काढून देण्यात आलेले पैसे असल्याचा दावा त्याने केला आहे. त्याची बँक खाती तपासल्यास ते सिद्धही होईल. हवाला प्रकरणातच जर चौकशी करायची असेल, तर या विषयीची चौकशी ही अंमलबजावणी खात्याच्या अखत्यारित येते, असा युक्तिवाद सोनीचे वकील नितीन सरदेसाई यांनी केला.दरम्यान, या प्रकरणात पुढील सुनावणी ही 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)