शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या मतदारसंघात सोनिया गांधींचा रोड शो

By admin | Updated: August 3, 2016 06:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातून पक्षाच्या प्रचाराचा बिगुल फुंकताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी येथे मोठा ‘रोड शो’ केला.

वाराणसी : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातून पक्षाच्या प्रचाराचा बिगुल फुंकताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी येथे मोठा ‘रोड शो’ केला. सर्किट हाउस ते इंग्लिशिया लाइनपर्यंत ८ कि.मी. लांबीच्या या रोड शोमध्ये काँग्रेसचे हजारो समर्थक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्किट हाउस येथे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सोनिया गांधी यांनी त्यांच्या रोड शोला प्रारंभ केला. या पवित्र शहरातील गल्ल्या आणि अरुंद रस्त्यातून वाट काढत पक्षाच्या उत्तर प्रदेशातील विजयाचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला. सोनिया गांधी आधी कारमधून प्रवास करीत होत्या; मात्र नंतर छत नसलेल्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली. सोनिया यांनी लोकांना हात हलवून अभिवादन करताना मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाही दिल्या. मुस्लीम महिलांच्या गटासह समर्थकांच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी त्या अनेकदा वाहनातून बाहेर आल्या. रोड शोने अनेक भागांतून मार्गक्रमण केले. या वेळी सोनिया आणि त्यांच्या ताफ्यावर आजूबाजूच्या इमारतींतून गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. तत्पूर्वी मोदींच्या लोकसभा मतदारसंघातील प्रचार मोहिमेसाठी सोनिया यांचे येथील विमानतळावर आगमन झाले. विमानतळाहून शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत दुचाकी फेरी काढून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. >सारे नेते एकत्र; ‘२७ साल, यूपी बेहाल’चा नारावाहनांच्या ताफ्यातील अनेक वाहनांवर ‘२७ साल, यूपी बेहाल’ या घोषणांचे बॅनर्स होते, तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या हातातही याच घोषणांचे फलक होते. पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित, काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रमोद तिवारी तसेच संजय सिंह आदी नेते सोनिया यांच्यासोबत होते. सोनिया गांधी संध्याकाळी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेणार होत्या. मात्र त्यांना प्रचंड ताप असल्याने त्या दर्शन घेऊ शकल्या नाहीत. तसेच पत्रकार परिषदही घेऊ शकल्या नाहीत. त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि त्या दिल्लीला रवाना झाल्या.