शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पुत्र फॉर्म्युला राज्यसभेत

By admin | Updated: May 1, 2015 01:44 IST

योगगुरु व हरियाणा सरकारचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या ‘दिव्य पुत्रबीजक’ नामक औषधावरून राज्यसभेत गुरुवारी जोरदार गोंधळ झाला.

संसदेत गोंधळ : सरकारने दिले कारवाईचे आश्वासनजयशंकर गुप्त - नवी दिल्लीयोगगुरु व हरियाणा सरकारचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या ‘दिव्य पुत्रबीजक’ नामक औषधावरून राज्यसभेत गुरुवारी जोरदार गोंधळ झाला. आरोग्यमंत्री ्रजे.पी. नड्डा यांनी या प्रकरणाच्या कारवाईचे आश्वासन दिले. या आयुर्वेदिक औषधाचे सेवन केल्यानंतर मुलगाच होतो, या दाव्यासह संबंधित औषधाची विक्री सुरू असल्याचा आरोप आहे. जनता दल (युनायटेड)चे के.सी. त्यागी यांनी शून्यप्रहरादरम्यान सभागृहात हा मुद्दा उपस्थित करीत, याप्रकरणी कारवाईची मागणी केली.त्यागी यांनी सभागृहात ‘दिव्य पुत्रबीजक’ औषधाचे एक पाकीट दाखवले. औषधाचे हे पाकीट आपण दिव्य फार्मसीमधून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. या औषधाच्या सेवनाने पुत्रप्राप्ती होते, असा दावा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दिव्य फार्मसीतून औषध खरेदी केल्याची पावती दाखवत, या निमित्ताने त्यांनी मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली. भाजपाप्रणित रालोआ सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या गोष्टी करते. त्याचवेळी हरियाणा सरकारद्वारे नियुक्त बॅ्रण्ड अ‍ॅम्बेसडर पुत्रप्राप्तीची औषधे विकतात. पुत्रप्राप्तीची औषध विक्री अवैध आणि घटनाबाह्ण असल्याचा आरोप त्यांनी केला.सपाच्या जया बच्चन यांनी के.सी. त्यागी यांच्याकडून औषधाचे ते पाकीट घेऊन आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांना दिले. नामनियुक्त सदस्य जावेद अख्तर, सपाचे नरेश अग्रवाल, माकपाचे सीताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी त्यागींना पाठिंबा दर्शवला. यानंतर नड्डा यांनी हा मुद्दा आयुष विभागांतर्गत येत असल्याचे सांगत या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. लिंग गुणोत्तरामधील तफावत गंभीर आहे. सरकार याबाबत चिंतित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमाची निगराणी करीत आहेत, असे ते म्हणाले.पतंजली योगपीठात ‘पुत्रवती’ नामक औषधाच्या विक्रीवरून मोठा वाद यापूर्वीही निर्माण झाला होता. २००७ मध्ये उत्तराखंड सरकारच्या आदेशावरून या प्रकरणाची चौकशीही झाली होती. यानंतर या औषधाची विक्री थांबविण्यात आली होती. पतंजली योगपीठाच्या संकेतस्थळावर औषधांची यादी दिली आहे. या यादीत पुत्रप्राप्तीसाठीच्या या औषधाच्या नावाचाही समावेश आहे. वादानंतर दिव्य फार्मसीच्या या औषधाचे नाव बदलून ‘पुत्रजीवक बीज’ करण्यात आले होते.