शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जेईईत कम्पाऊंडरचा मुलगा आला पहिला

By admin | Updated: April 27, 2017 17:59 IST

सीबीएसईनं आज जेईई मेन 2017 या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27- सीबीएसईनं आज जेईई मेन 2017 या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जेईईमधल्या प्रवेश परीक्षेत राजस्थानमधील कल्पित वीरवाल हा मुलगा देशातून पहिला आला आहे. कल्पितला जेईई प्रवेश परीक्षेत 360 पैकी 360 असे पूर्ण गुण मिळाले आहेत. वीरवाल हा आता 17 वर्षांचा आहे. वीरवाल याचे वडील उदयपूरमधल्या महाराणा भूपल सरकारी रुग्णालयात कम्पाऊंडरची नोकरी करतात. तसेच आई एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. कल्पितचा भाऊ एम्समधून मेडिकलच्या अभ्यासाचे धडे गिरवतो आहे.हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, वीरवालला ही आनंदवार्ता सीबीएसईचे चेअरमन आर. के. चतुर्वेदी यांनी फोनवरून सांगितली आहे. कल्पित हा सर्व कॅटेगरीत टॉपर आहे. कल्पित म्हणाला, टॉपर होणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र या परिस्थितीला मी सामान्यपणे घेतोय. आता मी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी मेहनत घेतोय. दरम्यान, एमडीएस खासगी शाळेतून कल्पितनं 12वीची परीक्षा दिली आहे. त्याचा निकाल येणं अजून बाकी आहे. स्वतःच्या यशासाठी कल्पितनं रेजोनन्स अ‍ॅडव्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, उदयपूरचे शिक्षक आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त वीरवालला क्रिकेट, बॅडमिंटन आणि गाण्याचीही आवड आहे. करिअरबद्दल विचारले असता तो म्हणाला, अजून काही ठरवलं नाही, मात्र आयआयटी बॉम्बेमधून कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. जेईई प्रवेश परीक्षा 2017ही 2 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला जवळपास 10 लाख विद्यार्थी बसले होते. त्यातील 2.20 लाख विद्यार्थ्यांची जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.