शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

सोमनाथ भारतींना दोन वर्षांची शिक्षा; अपिलात न्याय मिळण्याची ‘आप’ला आशा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 2:16 AM

९ सप्टेंबर २०१६ रोजी भारती यांनी सुमारे ३०० लोकांसह येथील एम्सच्या कुंपणाची भिंत जेसीबी मशीनच्या साह्याने पाडली होती.

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) सुरक्षा कर्मचाऱ्यांवर २०१६ मध्ये हल्ला केल्याच्या प्रकरणात आम आदमी पार्टीचे आ. सोमनाथ भारती यांना दोन वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या निकालानंतर आपने म्हटले आहे की, सोमनाथ यांच्यावर अन्याय झालेला असून, आता ते एक अपील दाखल करणार आहेत. तेव्हा तरी आता त्यांना न्याय मिळेल, अशी आशा वाटते आहे.

९ सप्टेंबर २०१६ रोजी भारती यांनी सुमारे ३०० लोकांसह येथील एम्सच्या कुंपणाची भिंत जेसीबी मशीनच्या साह्याने पाडली होती. न्यायालयाने भारती यांना भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार दोषी ठरविले. यात हल्ला करणे, लोकसेवकांना कर्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी ताकदीचा वापर करणे, दंगल करणे आदी आरोपांचा समावेश आहे. या आरोपांवर भारती यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच इतर साक्षीदारांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यासाठी साक्ष दिली होती. न्यायालयाने दिल्लीचे माजी कायदामंत्री असलेले भारती यांना त्यांच्या शिक्षेच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी जामीन दिला आहे.

दरम्यान, आपने म्हटले आहे की, आम्ही न्यायपालिकेचा सन्मान करतो. आम्हाला न्यायपालिकेवर संपूर्ण विश्वास आहे. तथापि, सोमनाथ यांच्यावर अन्याय झाल्याची आमची भावना आहे. सोमनाथ हे लोकप्रिय नेते आहेत व त्यांच्या मतदारसंघातील लोक त्यांच्यावर प्रेम करतात. ते त्यांच्या लोकांसाठी २४ तास काम करतात.

‘चुकीच्या पध्दतीने गाेवले’आरोपांवर भारती यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच इतर साक्षीदारांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यासाठी साक्ष दिली होती. न्यायालयाने दिल्लीचे माजी कायदामंत्री असलेले भारती यांना त्यांच्या शिक्षेच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी जामीन दिला आहे.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीCourtन्यायालय