शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काही शक्ती देशात अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:08 IST

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे असलेल्या पटेल पुतळ्याच्या (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली व पटेल यांना आदरांजली अर्पण केली.

एकतानगर : देश व विदेशातील काही शक्ती या भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा, तसेच साऱ्या जगात देशाची प्रतिमा नकारात्मक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा शहरी नक्षलवाद्यांची ओळख पटवून त्यांना उघडे पाडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जनतेला केले. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे असलेल्या पटेल पुतळ्याच्या (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली व पटेल यांना आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी मोदी म्हणाले की, भारताच्या वाढत्या सामर्थ्यामुळे देश व विदेशातील काही शक्ती आपल्या देशाच्या आर्थिक हिताला बाधा आणू इच्छितात. जगभरातील गुंतवणूकदारांच्या मनात भारताबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे काही लोक लष्करावर टीका करतात, तसेच लष्करामध्ये फुटीरतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत. (वृत्तसंस्था)

‘काही जणांचे दुही माजविण्याचे काम’ नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, काही लोक नेहमी लोकशाही, राज्यघटनेबद्दल बोलत असतात व प्रत्यक्षात ते देशात दुही माजविण्याचे काम करतात. या शहरी नक्षलवाद्यांची कारस्थाने जनतेने वेळीच ओळखावीत. नक्षलवाद संपवत आणला आहे. आता शहरी नक्षलवाद डोके वर काढत आहे. त्यांच्या विरोधात लढा देणे आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील नक्षलवादी चळवळ आता अखेरचा श्वास घेत आहे. पटेल यांची १५०वी जयंती देश दोन वर्षे साजरी करणार आहे, असेही माेदी म्हणाले.

‘योजनांमध्ये ऐक्याचा विचार’पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या केंद्र सरकारने अमलात आणलेल्या योजनेमध्ये देशातील ऐक्याचा प्राधान्याने विचार केला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान आवास योजना, जीएसटी आदी योजनांचा उल्लेख केला.  भारतीय राज्यघटनेच्या तरतुदी जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात अडथळे ठरणारे ३७० कलम आमच्या सरकारने रद्द केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर तेथील मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भारतीय राज्यघटनेला स्मरून आपल्या पदाची शपथ घेतली. ही मोठी घटना आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी