शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

सोमय्यांनी लाटला ‘एसआरए’ प्रकल्प

By admin | Updated: May 16, 2016 04:50 IST

सत्तेच्या गैरवापराचा आरोप करणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या हे स्वत:च भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून, झोपडपट्टीवासीयांचा प्रकल्प लाटत असल्याची गंभीर बाब समोर आली

मुंबई : राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचार आणि सत्तेच्या गैरवापराचा आरोप करणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या हे स्वत:च भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून, झोपडपट्टीवासीयांचा प्रकल्प लाटत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सोमय्या यांनी आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘मेधा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या माध्यमातून सांताक्रुझ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) लाटला असून, स्थानिक रहिवाशांवर बेघर होण्याची पाळी आली आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी पत्रकार परिषदेत केला.सांताक्रुझमधील कलिना येथील स्वामी विवेकानंद एसआरए प्रकल्पातील अनियमितता आणि त्यामुळे झोपडपट्टीवासीयांना होणाऱ्या त्रासाबाबत कल्पना इनामदार यांनी सांगितले की, ‘किरीट सोमय्या यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘मेधा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’ने कलिना येथील हा एसआरए प्रकल्प खिशात घातला आहे. त्यासाठी मृत व्यक्तीच्या नावे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. नियमबाह्य पद्धतीने हा प्रकल्प रेटण्यात येत असून, त्यास स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. १३ वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प सुरुवातीस जेमिनी बिल्डरमार्फत राबविण्यात येत होता. त्यानंतर, तो डॉमिनंड डेव्हलपर्सकडे आला. मात्र, सोमय्यांच्या ‘मेधा डेव्हलपर्स’ने डॉमिनंड डेव्हलपर्सशी हातमिळवणी करत, १५ कोटी रुपयांत हा प्रकल्प पदरात पाडून घेतला. त्यास झोपडपट्टीवासीयांची संमती नव्हती. दरम्यानच्या काळात, जमिनीचे मालक रमेश मल्होत्रा यांचे निधन झाले. त्यानंतर, सोमय्या यांनी मयत विकासकाचे प्रतिनिधी म्हणून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत, न्यायालयाची दिशाभूल करणारी माहिती त्यात दिली, असेही इनामदार यांचे म्हणणे आहे. उपजिल्हाधिकारी संदीप कळंबे यांनी सोमय्या यांच्या आदेशावरूनच झोपडपट्टीवासीयांवर कारवाई करण्याची नोटीस दिली आहे. कारण या आधीचे अप्पर जिल्हाधिकारी हिरालाल सोनवणे यांच्याकडे झोपडपट्टीवासीयांनी अपील केले होते. त्यावेळी सोनवणे यांनी विकासकाकडे इंटीमेशन आॅफ अ‍ॅप्रूव्हल नसल्याचे कारण देत, झोपडपट्टीवासीयांच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र, या निकालावर सोमय्या यांनी विकासक मयत असल्याने, त्यांचे प्रतिनिधी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाची दिशाभूल करून निकाल पदरात पाडून घेतल्याचा दावा इनामदार यांनी केला आहे. (प्रतिनिधी)अधिकारी हाताशीया प्रकल्पाच्या पुनर्विकास बांधकाम परवानगीची मुदत संपली असतानाही, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता यांनी विकासकांच्या बाजूने निकाल दिला. अधिकाऱ्यांना हाताशी धरून सोमय्या यांनी प्रकल्प रेटला आहे. सोमय्या आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे स्थानिक झोपडपट्टीवासीयांवर सोमवार, १६ मे रोजी निष्कासनाची कारवाई होणार असल्याचा आरोप इनामदार यांनी केला. २३३ पैकी केवळ१७३ झोपड्या पात्रया प्रकल्पात एकूण २३३ झोपड्या असतानाही केवळ १७३ झोपड्यांना पात्र ठरवण्यात आले आहे. त्यातील १० झोपडपट्टीवासीयांवर सोमवारी निष्कासनाची कारवाई करण्याची नोटीस धाडण्यात आली आहे.त्यामुळे स्थानिक झोपडीवासीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.