शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त होताना समाधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 01:01 IST

भारताची राज्यघटना हे केवळ प्रशासन व्यवस्थेचे कायद्याचे पुस्तक नाही. १०० कोटींहून अधिक भारतीय नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे ते प्रतिबिंब आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताची राज्यघटना हे केवळ प्रशासन व्यवस्थेचे कायद्याचे पुस्तक नाही. १०० कोटींहून अधिक भारतीय नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे ते प्रतिबिंब आहे. राष्ट्रपती या नात्याने आपण या राज्यघटनेचे फक्त वाक्यार्थाने नव्हे तर भावार्थानेही रक्षण आणि जतन करण्याचा मनापासून प्रयत्न केला. देशवासियांचा विनम्र सेवक म्हणून हे करण्याचे भाग्य मिळाले या समाधानाच्या आणि कृतार्थ भावनेने मी निवृत्त होत आहे, अशा भावपूर्ण शब्दांत मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी संसदेचा निरोप घेतला.सहा दशके अनेक जबाबदाऱ्या सांभाळत सार्वजनिक जीवनात सर्वांच्याच आदराचा आणि कौतुकाचा विषय ठरलेल्या प्रवदांना राष्ट्रपतीपदावरून पायउतार होण्यास दोन दिवस राहिलेले असताना संसदेने एका हृद्य सोहळ््यात या मावळत्या राष्ट्रप्रमुखाला औपचारिक निरोप दिला. राष्ट्रपती या नात्याने संसदेत शेवटचे भाषण करताना मुखर्जी भावनाविवश झाले व अनेक जुन्या स्मृती त्याच्या मनात उचंबळून आल्या. त्यांचे भाषण म्हणजे वडिलधाऱ्याने दिलेला अनुभवाचा सल्ला होता.संसदेने जीएसटीला एकमताने दिलेली मंजुरी हे लोकशाहीच्या प्रगल्भतेचे द्योतक आहे, असे सांगून मुखर्जी यांनी समाधान व्यक्त केली. मात्र या समाधानाला थोडीशी खेदाची झालर लावत त्यांनी विधेयकांवर साधकबाधक चर्चा करून मंजुरी देण्यासाठी संसदेत कमी वेळ दिला जात असल्याबद्दल त्यांच्या शब्दांतून नाराजी जाणवली. माझ्या राजकीय विचारांना आणि सार्वजनिक आचरणाला याच संसदेने घडविले. याच संसदेतून मी तयार झालो असे म्हणजे औधत्याचे होणार नाही, असेही मुखर्जी यांनी नमूद केले. थोडीशी खंत आणि असंख्य स्मृतींचे इंद्रधनुष्य मानत घेऊन मी आज या लोकशाहीच्या भव्य मंदिराची रजा घेत आहे, असे ते म्हणाले. सुरुवातीस लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व राज्यसभेचे सभापती हामीद अन्सारी यांनी सर्व सदस्यांच्या वतीने मावळत्या राष्ट्रपतींविषयी आदरभाव व्यक्त केला. मुखर्जी यांनी प्रगल्भ कतृत्वाने राष्ट्रपतीपदाची उंची आणखी वाढविली, असे अन्सारी म्हणाले. ज्यांच्यामुळे भारतीय संसद जिवंत आणि समद्ध झाली अशा अनेक थोर पूर्वसुरींच्या सहवासाचे व त्यांच्याकडून शिकण्याचे भाग्य लाभले याबद्दल मुखर्जी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी पिलू मोदी, हिरेन मुखर्जी, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी आणि लालकृष्ण आडवाणी यांचा नामोल्लेख केला. स्वत:ला सुधारणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे मी इंदिराजींकडून शिकलो. नरसिंह राव आणि वाजपेयी यांच्यामुळे माझे संसदीय जीवन समृद्ध झाले तर आडवाणींनी मला प्रगल्भ सल्ला दिला, असे त्यांनी सांगितले.इंदिराजी उत्तुंग मार्गदर्शकउत्तुंग व्यक्तिमत्वाच्या इंदिराजी या आपल्या राजकीय कारकिर्दीच्या मार्गदर्शक होत्या, असे आदराने नमूद करून प्रणवदा म्हणाले की, सत्य किती कटु असले तरी ते स्पष्टपणे मांडण्याचा धारिष्ट्य त्यांच्याकडे होते. या संदर्भात त्यांनी एक किस्सा सांगितला. आणिबाणीनंतरच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर १९७८ मध्येत्या लंडनला गेल्या. पत्रकारांनी आक्रमकतेने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. पहिला प्रश्न होता, ‘आणिबाणी लादून तुम्ही काय मिळवलंत?’. प्रश्नकर्त्याच्या थेट डोळ््यात पाहात इंदिराजी उत्तरल्या, ‘त्या २१ महिन्यांत समाजाच्या सर्व वर्गांपासून दूर जाण्यात आम्हाला यश आले’. त्यानंतर एकानेही आणिबाणीबद्दल पुढचा प्रश्न विचारला नाही.