शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी नावेदविरुद्ध ठोस पुरावे

By admin | Updated: September 3, 2015 01:33 IST

उधमपूर अतिरेकी हल्ल्यादरम्यान अटक करण्यात आलेला अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब हा पाकी नागरिक नाहीच, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला उघडे

नवी दिल्ली : उधमपूर अतिरेकी हल्ल्यादरम्यान अटक करण्यात आलेला अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब हा पाकी नागरिक नाहीच, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी भारताने नावेदविरुद्धचे ठोस परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहेत. नावेदचे नातेवाईक आणि मित्रांचे फोन क्रमांक, काही छायाचित्रे, त्यांची नावे, पत्ते हे सर्व भारताच्या हाती लागले आहे.नावेद हा पाकी नागरिक आहे, हे सिद्ध करणारा डोजियर (पुराव्यांची कागदपत्रे) भारताने तयार केला आहे. पाकिस्तानात नावेदचे घर आणि त्याच्या नातेवाईकांच्या घराचे गुगल मॅप लोकेशन व काही छायाचित्रांचा यात समावेश आहे. हे डोजियर भारत-पाक यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानला सोपवले जाणार होते. मात्र तत्पूर्वीच ही चर्चा रद्द झाली. या डोजियरनुसार नावेदने पाकव्याप्त काश्मिरातील मुजफ्फराबादनजीकच्या जंगलात लष्कर ए तोयबाच्या शिबिरात प्रशिक्षण घेतले होते. २०११ पासून तीन प्रशिक्षण शिबिरात नावेदला प्रशिक्षण देणाऱ्या १७ भारतीयांची नावे यात आहेत. सोबतच नावेदसह या शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या अन्य १२ पाकी अतिरेक्यांचीही नावे आहेत. पाकिस्तानात नावेदने जोंग मोबाईल सेवेचा जो क्रमांक वापरला होता, तोही भारताकडे आहे. नावेद हा पाकचाच नागरिक आहे, याचे ठोस पुरावे देण्याच्यादृष्टीने या क्रमांकावरील कॉल डिटेल्स शोधण्यासाठी अमेरिकेची मदत मागण्याचा भारताचा विचार आहे.पाकिस्तानच्या नॅशनल डाटाबेस अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन अ‍ॅथॉरिटीने २०१४ मध्ये नावेदला ओळखपत्र जारी केले होते, असा दावाही भारताने या डोजियरमध्ये केला आहे. नावेद हे ओळखपत्र हरविल्याचा दावा करीत आहे. याशिवाय नावेदचे आई-वडील आणि तीन भाऊ-बहिणीचे नाव, त्यांचे मोबाईल क्रमांक, त्याच्या तीन काकांची नावे व पत्ते, २७ चुलत, मावस व मामेबहीण-भावांची नावे व पत्ते तसेच तनवीर, अफ्रिदी, कासीम व शाहद या चौघांचे नाव व पत्ते याचाही यात समावेश आहे.