शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जवानांच्या रेशनची बाजारात विक्री

By admin | Updated: January 12, 2017 01:09 IST

सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकारी जवानांचे रेशन कमी दराने स्थानिक बाजारपेठेत विकतात, असा दावा स्थानिक लोकांनी केला.

श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकारी जवानांचे रेशन कमी दराने स्थानिक बाजारपेठेत विकतात, असा दावा स्थानिक लोकांनी केला. बीएसएफचा जवान तेजबहादूर याने पोस्ट केलेल्या जवानांच्या निकृष्ट अन्नाच्या व्हिडिओमुळे देशभर खळबळ उडालेली असताना हा प्रकार समोर आला. निमलष्करी दलांच्या विशेषत: बीएसएफच्या छावणीजवळ राहणाऱ्या लोकांना अधिकारी बाजारमूल्याच्या निम्म्या दराने रेशन व इंधन विकतात, असे वृत्त इंग्रजी दैनिकाने स्थानिकांच्या हवाल्याने दिले आहे. बीएसएफ जवान तेजबहादूर यादवने आपल्या व्हिडिओत याचा उल्लेख केला होता. सरकार आमच्यासाठी पुरेशे रेशन पाठवते; परंतु अधिकारी त्याची परस्पर विक्री करतात, असे तेजबहादूरने म्हटले होते. त्याच्या या आरोपाची आसपास राहणाऱ्या लोकांनी पुष्टी केली आहे. विमानतळाजवळ बीएसएफचे मुख्यालय आहे. तेथील अधिकारी आसपासच्या दुकानदारांना कमी दरात रेशन आणि इंधन विकतात, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली. ओळख उघड न करण्याच्या अटीवर एका बीएसएफ जवानानेच सांगितले की, अधिकारी स्थानिक बाजारांत डाळ आणि भाज्या या वस्तू बाजारभावाहून कमी दरात विकतात. आम्हाला अनेकदा दैनंदिन वापराच्या वस्तूही मिळत नाहीत. अधिकारी दलालाच्या माध्यमातून त्यांची बाजारपेठेत विक्री करतात. हुमहमा छावणीतील काही अधिकाऱ्यांकडून निम्म्या दरात डिझेल, पेट्रोल मिळते. तांदूळ, मसाले आणि डाळ यासारख्या वस्तूही अत्यंत कमी दरात मिळतात, असे एका बांधकाम ठेकेदाराने सांगितले. (वृत्तसंस्था)