शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मुलायम चितपट! अखिलेश यादव बनले सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष

By admin | Updated: January 1, 2017 12:42 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 1 -  गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंग यादव परिवार आणि समाजवादी पक्षात सुरू असलेल्या यादवीत अखेर अखिलेश यादव यांनी बाजी मारली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला आज सकाळी बोलावण्यात आलेल्या समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय  अधिवेशनात अखिलेश यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबरोबरच समाजवादी पक्षात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.   
अखिलेश आणि रामगोपाल यांचे निलंबन मागे घेण्यात आल्यावर सपामध्ये सारे काही आलबेल झाल्याचे चित्र रंगवण्यात येत होते. मात्र रविवारी नियोजित असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांनी शक्तिप्रदर्शन केले . लखनऊत झालेल्या सपाच्या या राष्ट्रीय अधिवेशनात प्रा. रामगोपाल यादव यांनी अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून या प्रस्तावास अनुमोदन दिले. 
 
ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव  यांना पक्षाचे मार्गदर्शक बनवण्यात आले आहे.  यावेळी शिवपाल यादव यांना समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्याबरोबरच सपा आणि यादव परिवारातील वादात कळीच्या नारदाची भूमिका बजावल्याचा आरोप असलेल्या  अमर सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज रामगोपाल यादव यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास उपस्थित राहू नये असे आवाहन मुलायम  सिंग यादव यांनी कार्यकर्त्यांना केले होते. मात्र मुलायम यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत कार्यकर्ते आणि नेत्यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. 
 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवार निवडीवरून समाजवादी पक्षातील वाद उफाळून आला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मुलायम सिंग यादव यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवले होते. मात्र एका दिवसातच हे निलंबन मागे घेण्यात आल्याने यादव परिवार आणि समाजवादी पक्षात सुरू असलेली  यादवी संपल्याची चिन्हे दिसत होती. मात्र  रविवारी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यावर ठाम असलेल्या अखिलेश  गटाने आज अधिवेशन बोलावून शिवपाल यादव यांच्यासह मुलायम सिंग यादव यांना धोबीपछाड दिला.