शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा सुरक्षारक्षकांनी कोविंद यांना राष्ट्रपती निवासाच्या दारातूनच धाडले होते माघारी

By admin | Updated: June 20, 2017 19:15 IST

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शक्याशक्यतांना पूर्णविराम देत भाजपाकडून राष्ट्रपतीपाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचे नाव काल जाहीर

ऑनलाइन लोकमत
सिमला, दि. 20 -अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शक्याशक्यतांना पूर्णविराम देत भाजपाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचे नाव काल जाहीर करण्यात आले होते. भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआकडे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव होत असल्याने कोविंद यांचे निवडून येणेही निश्चित मानले जात आहे. मात्र याच कोविंद यांना महिनाभरापूर्वी राष्ट्रपतींच्या अधिकृत आवासाच्या दारातून माघारी धाडण्यात आले होते. 
गेल्या महिन्यात 30 मे रोजी कोविंद हे सिमला दौऱ्यावर गेले होते. तेव्हा भारताच्या राष्ट्रपतींचे तेथील अधिकृत निवासस्थान असलेल्या द रिट्रीट येथे ही घटना घडली होती. कोविंद यांच्याकडे राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून आवश्यक मंजुरीची कागदपत्रे नसल्याचे सांगत द रिट्रीटच्या सुरक्षा रक्षकांनी कुटुंबासहीत तेथे आलेल्या कोविद यांना माघारी धाडले होते. या संदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे.  
(...म्हणून वरिष्ठ मंत्र्यांना डावलून मोदींनी रामनाथ कोविंद यांना दिली पसंती)
 
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि आता भाजपाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनलेले कोविंद यांच्यात मैत्री आहे. बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहत असलेले कोविंद देवव्रत यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी  सिमला येथे गेले होते. दुसऱ्याच दिवशी कोविंद यांच्या लग्नाचाही वाढदिवस होता. त्यांना सिमला येथील पर्यटनस्थळांची माहिती नव्हती. तेव्हा हिमाचलच्या राज्यपालांचे सल्लागार शशिकांत शर्मा यांनी त्यांना द रिट्रीट येथे जाण्याचा सल्ला दिला. मात्र तेथे आपल्या कुटुंबासहीत गेलेल्या कोविंद यांना सुरक्षा रक्षकांनी नियमावर बोट ठेवत गेटवरूनच आल्या पावली माघारी घाडले होते. या घटनेबाबत शर्मा म्हणतात की आपण ज्या व्यक्तीला दरवाजावरून परतवले तीच व्यक्ती काही दिवसांनी येथे राष्ट्रपती म्हणून येण्याची शक्यता आहे, याची सुरक्षारक्षकांना तेव्हा कल्पनाही नव्हती.  हिमाचलमधील मशोबरा येथे असलेल्या द रिट्रीटला भारताचे राष्ट्रपती वर्षातून एकदा जरूर भेट देतात.