शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून त्या काश्मिरी युवकाला जीपला बांधावे लागले - मेजर गोगोई

By admin | Updated: May 23, 2017 18:58 IST

काश्मिरी युवकाला जीपला बांधणारे मेजर नितीन गोगोई यांना लष्कराने सन्मानित केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयांवरुन वाद सुरु झाला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. 23 - काश्मिरी युवकाला जीपला बांधणारे मेजर नितीन गोगोई यांना लष्कराने सन्मानित केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयांवरुन वाद सुरू  झाला आहे. काहींनी लष्कराच्या या निर्णयावर टीका केलेली असताना मेजर गोगोई यांनी स्वत:हून समोर येत या संपूर्ण घटनेची प्रसारमाध्यमांना माहिती दिली. 
 
काश्मिरी युवकाला जीपला बांधण्याचा निर्णय आपल्याला का घ्यावा लागला ? त्यावेळी काय परिस्थिती होती त्याची गोगोई यांनी मंगळवारी संध्याकाळी विस्तृत माहिती दिली. "काश्मीरमध्ये निष्पक्ष निवडणूका पार पाडण्यासाठी शांतता राखण्याची जबाबदारी आमच्यावर होती. मला मतदान केंद्रावर दगडफेक होत असल्याचे समजल्यानंतर मी तिथे गेलो. चार निवडणूक कर्मचारी आणि सात आयटीबीपीच्या जवानांची सुटका केली. आम्ही बाहेर आलो तेव्हा आमच्यावर सर्व बाजूंनी दगडफेक सुरु होती. दगडफेक करणारे आमच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकत होते. अशा परिस्थिती स्थानिक आणि निवडणूक कर्मचा-यांना वाचवण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधण्याचा निर्णय घ्यावा लागला," असे मेजर गोगोई यांनी सांगितले. 
 
मेजर नितीन गोगोई यांना नुकतेच दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमंडेशनने सन्मानित करण्यात आले होते.  लष्कराने गोगोई यांच्यावर होत असलेल्या टीकेला झिडकारून लावत त्यांचा सन्मान केला आहे. एक सर्वसामान्य जवान ते आर्मी सर्व्हिस कॉपमध्ये मेजरच्या हुद्यापर्यंत पोहोचलेल्या गोगोई यांच्या एका युवकाला जीपला बांधून मानवी ढाल बनवण्याच्या कृतीवर फार टीका झाली होती.  गोगोई यांच्यावर मानवाधिकार आणि जिनेव्हा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप लागला होता.