शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून मोदी-शहांना भावले योगी आदित्यनाथ

By admin | Updated: March 20, 2017 10:15 IST

योगी आदित्यनाथ यांची झालेली निवड हा राजकीय विश्लेषकांपासून ते खुद्द भाजपामध्ये अनेकांसाठी अनपेक्षित धक्का आहे.

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 20 - उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची झालेली निवड हा राजकीय विश्लेषकांपासून ते खुद्द भाजपामध्ये अनेकांसाठी अनपेक्षित धक्का आहे. कारण संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपाच्या महत्वाच्या पोस्टर्सवर किंवा परिवर्तन व्हॅनवर कुठेही आदित्यनाथ यांचा फोटो नव्हता. हिंदुत्वापेक्षा विकासाच्या मुद्यावर सर्वाधिक भर देऊन भाजपाने ही निवडणूक लढवली. 
 
त्यामुळे योगी आदित्यनाथ सारख्या आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करणा-या चेह-याला मुख्यमंत्रीपदी संधी मिळेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचाराच्या एका टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर आपले महत्व सिद्ध करुन दाखवले. उत्तरप्रदेशात भाजपाने निवडणूक प्रचारात रोड शो वर भर दिला होता.  
 
उत्तरप्रदेशमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य खासदार असलेल्या अलाहाबादमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी एक रोड शो केला. या रोड शो ला ब-यापैकी गर्दी जमली पण हा रोड शो तितका प्रभावी ठरला नाही. तेच सहाव्या टप्प्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 मार्चला अमित शहांनी गोरखपूरमध्ये रोड शो केला. त्यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.  आदित्यनाथ यांनी जणू संपूर्ण गोरखपूरचा रस्त्यावर उतरवले होते. या रोड शो मधील आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेने अमित शहा यांना 'इम्प्रेस' केले. जमलेली गर्दी योगी, योगीचा नारा देत होती. ही बाब भाजपा श्रेष्ठींनी ध्यानात घेतली. 
 
योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या अजेंडयाच्या आड येईल असा आरोप विरोधकांकडून केला जायचा. यावर योगी समर्थक  पंतप्रधान मोदींचे  सुद्धा योगी आदित्यनाथांबद्दल अनुकूल मत होते हे पटवून देण्यासाठी काही उदहारणे देतात.  मागच्यावर्षी जुलै महिन्यात महंत अवैद्यनाथ यांच्या पुतळच्या अनावरणासाठी पंतप्रधान मोदी गोरखनाथ मंदिरात आले होते. गोरखपूरमध्ये एम्स रुग्णालयासाठी पायाभरणी केली त्यावेळी सुद्धा मोदींनी जनसभेला संबोधित केले होते. त्यामुळे मोदींनी आदित्यनाथ यांच्याकडे दुर्लक्ष केले नव्हते.