नवी दिल्ली : अल-कायदा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा शोध घेण्यासाठी अमेरिकेने जंगजंग पछाडले होते. त्याचा पाकिस्तानातील छुप्या घराचा शोध लावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या खास लष्करी कुत्र्याचे संकरित वाण असलेल्या स्निफर कुत्र्याला आता राष्ट्रीय सुरक्षा गार्डमध्ये(एनएसजी) अपहरणविरोधी कमांडो आॅपरेशनमध्ये स्थान मिळाले.अमेरिकेच्या नौदलात ‘बेल्जियन मॅलिनोईस’ या जातीच्या कुत्र्याने खास कामगिरी बजावली आहे. ओसामाचा छडा लावण्यानंतर त्याला एखाद्या हिरोसारखी प्रसिद्धी मिळाली. भविष्यात दहशतवादविरोधी मोहिमांची जबाबदारी एनएसजीच्या ब्लॅक कॅट कमांडोंकडे राहणार असून या जातीच्या किमान एक डझन कुत्र्यांना खास मोहिमांमध्ये स्थान राहील. जगभरात या कुत्र्यांच्या जातींचा दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये समावेश केला जात आहे. सध्या खास के-९ कुत्र्यांच्या पथकामध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने त्याबाबत माहिती दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)