शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एसएमटीच्या बसला नाहीत टायर

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

सोलापूर : केंद्र शासनाच्या योजनेतून एसएमटीकडे (मनपा परिवहन) नव्या कोर्‍या बस आल्या असल्या तरी जुन्या बसची वाट लागली आहे. जुन्या बस चार टायरवर धावत असून, रस्त्यातच बंद पडत आहेत.

सोलापूर : केंद्र शासनाच्या योजनेतून एसएमटीकडे (मनपा परिवहन) नव्या कोर्‍या बस आल्या असल्या तरी जुन्या बसची वाट लागली आहे. जुन्या बस चार टायरवर धावत असून, रस्त्यातच बंद पडत आहेत.
नव्या बसचा ताफा आल्याने ग्रामीण हद्दीत ४0 किमी घुसखोरीची तयारी करणार्‍या एसएमटीची अवस्था बिकट होणार आहे हे आत्तापासूनच जाणवू लागले आहे. जुन्या बसचे टायर झिजले असून, रिमोल्ड करण्यासाठी पैसे नाहीत अशी स्थिती झाली आहे. चार चाकावर बस धावू लागल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ज्ञानेश्वरनगरकडे (बस क्र. ४७) जाणारी बस मागील दोन्ही टायर फुटल्याने जानकीनगरजवळ बंद पडली. यामुळे सकाळी शाळेला जाणार्‍या मुलांचे हाल झाले. बसची पाहणी केल्यावर मागील टायरची मोठ्या प्रमाणावर झीज झाल्याने ट्यूब बस्ट झाल्याचे दिसून आले. मागील दोन टायरपैकी एकाच झिजलेल्या टायरवर बस निघाली होती. ही बस दुरुस्त होण्यास दुपार झाली. जुळे सोलापुरातील अनेक नगरात बससेवा सुरू झालेली नाही. नवीन मार्ग बसच्या प्रतीक्षेत आहेत. नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.