शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पत्रातील ‘स्पेलिंग मिस्टेक’मुळे स्मृती इराणी नव्या वादात

By admin | Updated: August 21, 2015 22:31 IST

मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी पाठविलेल्या अभिनंदनपर पत्रातील चुकांकडे एका शिक्षिकेने लक्ष वेधताच सध्या हे पत्र नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनले असून

नवी दिल्ली : मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी पाठविलेल्या अभिनंदनपर पत्रातील चुकांकडे एका शिक्षिकेने लक्ष वेधताच सध्या हे पत्र नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनले असून त्यावरील तीव्र प्रतिक्रियांमुळे स्वत: इराणी यांनी ही चूक माझी नाही, असे सांगत हात झटकले आहेत. दरम्यान या चुकीबद्दल इराणी यांनी सीबीएसईला स्पष्टीकरण मागितले आहे.विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन करणारी पत्रे इराणी यांच्या स्वाक्षरीनिशी पाठविण्यात आली आहेत. त्यातील ‘मिनिस्टर‘ आणि ‘संसाधन’ हे दोन शब्द चुकीचे लिहिले आहेत. दिल्ली पब्लिक स्कूलच्या शिक्षिका रिचा कुमार यांनी ही चूक लक्षात आणून देताना फेसबुकवरील पोस्टवर एक शेराही मारला आहे. ‘‘माझ्या अभिनंदनाबद्दल आभार. गेल्या २० वर्षांपासून मी शिक्षिका आहे. तुमच्या सरकारी पत्रातील चुका माझ्यासारख्या भाषा शिक्षिकेच्या मनाला खटकल्या आहेत. निदान तुमच्या मंत्रालयात काम करणारे लोक तरी चांगल्याप्रकारे शिक्षित असावे ही खबरदारी कृपया घेतली जावी’’, असे त्या म्हणाल्या. त्यांनी फेसबुकवर चुका दाखविणारे पत्र टाकल्याने नेटवर संतप्त प्रतिक्रिया होऊ लागताच इराणी यांना जाग आली. त्यांनी तडकाफडकी चौकशीचा आदेश दिला आहे. ही चूक माझी नाही. मी हिंदीत माझे नाव लिहिण्यात चूक करणार नाही, असे स्पष्टीकरण देणारे टिष्ट्वट जारी करीत त्यांनी सारवासारव चालविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)