स्मार्ट किड स्कूलचे स्नेहसंमेलन
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
(६ बाय २)
स्मार्ट किड स्कूलचे स्नेहसंमेलन
(६ बाय २) स्मार्ट किड स्कूलचे स्नेहसंमेलननागपूर : स्मार्ट किड स्कूलमध्ये पाचव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पदक वितरित करण्यात आले. कार्यक्रमात प्राचार्य शक्तिमयी पांडा, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचा विस्तार होत असून स्वावलंबीनगर, कळमेश्वर, कळमना, चंद्रपूर येथे शाखा सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत स्मार्ट किड स्कूलमध्ये प्रयत्न करण्यात येतात. प्रवेशासाठी इच्छुकांनी २०१५-१६ सत्रासाठी संपर्क साधावा.