शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी छोट्या अमयचे प्रशंसनीय प्रयत्न

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

फोटो - रॅप

फोटो - रॅप
छायाचित्रांच्या माध्यमातून मांडले काश्मीरचे वास्तव : लंडनमधून मिळविली ६० हजाराची मदत
नागपूर : भारताचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचा सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराने विद्ध्वंस केला. लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील आपत्तीग्रस्तांना मदत व्हावी, म्हणून अमेय कुळकर्णी नावाच्या ९ वर्षीय बालकाने काश्मीरची चित्रे काढून, तेथील वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहचविली. त्याच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने कॅ मेराबद्ध केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत लावण्यात आले आहे.
इम्प्रेशन ऑफ इंडिया नावाने लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला छायाचित्रकार शेखर सोनी, शेफ विष्णू मनोहर, अमयचे आजी आजोबा मोहन व दुहिता कुळकर्णी, वडील अधिष कुलकर्णी उपस्थित होते. या प्रदर्शनात लावलेल्या छायाचित्रांची तो विक्री करून काश्मिरातील पूरग्रस्तांना मदत करणार आहे. मूळचा नागपूरचा असलेला अमेय सध्या आपल्या पालकासोबत लंडनला राहतो. गेल्या उन्हाळ्यात तो जम्मू-काश्मीरच्या सफरीवर गेला होता. त्याने तिथले भरपूर फोटो काढले. त्या छायाचित्रांचे प्रेझेंटेशन बनवून लंडनमधील आपल्या वर्गमित्रांना दाखविले. त्यांच्याकडून त्याने ६०,००० रुपयांची मदत मिळविली होती. अमेयच्या कृतीचे कौतुक व्हावे व मदतनिधीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने अमेयच्या आजी-आजोबांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन शुक्रवारी १९ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८.३० खुले राहणार आहे. प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतून जमा होणारा सर्व निधी प्रधानमंत्री आपत्ती निवारण कोषात दान केला जाईल.