शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत ‘गो बॅक वॉलमार्ट’चे नारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:07 IST

वॉलमार्टकडून होत असलेल्या फ्लिपकार्टच्या अधिग्रहणास उजव्या संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. काही संघटनांच्या सुमारे ८० कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत निदर्शने केली

नवी दिल्ली : वॉलमार्टकडून होत असलेल्या फ्लिपकार्टच्या अधिग्रहणास उजव्या संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. काही संघटनांच्या सुमारे ८० कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत निदर्शने केली. आंदोलकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचचे कार्यकर्तेही होते. कार्यकर्त्यांच्या हातात ‘गो बॅक वॉलमार्ट’ असे लिहिलेले फलक होते.फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय वॉलमार्टने बुधवारी जाहीर केला. हा व्यवहार सुमारे १६ अब्ज डॉलरचा आहे. अ‍ॅमेझॉन डॉट कॉमला टक्कर देण्यासाठी वॉलमार्टने भारतातील फ्लिपकार्टची खरेदी केली आहे.दरम्यान, कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (काइट) या शिखर संघटनेनेही या अधिग्रहणास विरोध केला. काइटचे सरचिटणीस प्रवीण म्हणाले की, या व्यवहाराविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाईच्या पर्यायाचा विचार करू. आजच्या निदर्शनांमुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे एक आव्हान उभे राहिले आहे. वॉलमार्टमुळे देशातील छोटे व्यापारी व शेतकºयांच्या हिताला बाधा येईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. भाजपाही छोटे व्यावसायिक व शेतकºयांना चुचकारतच राजकारण करीत आले आहेत. हा वर्ग भाजपाचा मतदार आहे. त्याच वेळी भारताची विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम देश अशी प्रतिमा मोदी यांनी कायम ठेवायची आहे. या निदर्शनांमुळे या प्रतिमेला तडा जाण्याचा धोका आहे.गंमत म्हणजे, विरोधी पक्षात असताना भाजपाने बहुब्रँड किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीस विरोध केला होता. आता सरकारमध्ये आल्यानंतर भाजपा त्याचे समर्थन करीत आहे. या मुद्द्यावरून माकपाने मोदी सरकारला टोमणा मारला आहे.सरकारी अधिकाºयांनी वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहारावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.गंमत म्हणजे विरोधी पक्षात असताना भाजपाने बहुब्रँड किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीस विरोध केला होता. आता सरकारमध्ये आल्यानंतर भाजपा त्याचे समर्थन करीत आहे. या मुद्यावरून माकपाने मोदी सरकारला टोमणा मारला आहे. तसेच भारताची विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम देश अशी प्रतिमा मोदी यांनी कायम ठेवायची आहे.