शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘फोनो’ प्रचाराने उडवली झोप

By admin | Updated: October 10, 2014 02:54 IST

निवडणुका जवळ येताच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी अनेक वेगवेगळे ‘फंडे’ आणण्यात येतात.

मुंबई : निवडणुका जवळ येताच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी अनेक वेगवेगळे ‘फंडे’ आणण्यात येतात. उमेदवारांकडून विधानसभा निवडणुकीतील प्रचारासाठी यंदा ‘फोनो’ प्रचारावर अधिक भर देण्यात आला आहे. मात्र आपल्या मतदारसंघातील मतदारांना फोन करून प्रचार करतानाच मतदारांची झोप उडत असल्याचे आता समोर येत आहे. ऐन दुपारी मतदारांच्या घरातील फोन वाजत असल्याने मतदार त्रस्त होत आहेत. विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरूच असून १३ आॅक्टोबर रोजी प्रचाराची अखेर होणार आहे. त्यामुळे प्रचारात आणखी जोर लावण्यात येत असून बाइक रॅली, प्रचार फेऱ्या आणि घरोघरी प्रचार करण्यावर अधिक भर दिला जात आहे. प्रत्येक उमेदवारांकडून आपला मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांनी ‘फोनो’ प्रचार करण्यावरही अधिक भर दिला आहे. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराशी संवाद साधण्यासाठी फोनो प्रचाराची निवड करण्यात आली आहे. यात मतदारांच्या घरातील लॅण्डलाइनवर फोन करून उमेदवाराचा पक्ष, त्याचे नाव सांगून येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. उमेदवारांकडून याचे काम काही कॉल सेंटरला देण्यात आले आहे. हा प्रचार करताना मात्र कुठल्याही प्रकारचे भान राहिलेले नसून दुपारी २ ते सायंकाळी चार या दरम्यान मतदारांच्या घरातील दूरध्वनी वाजत आहेत. त्यामुळे मतदारांची झोप उडत असून नाराजीही व्यक्त केली जात आहे. मुंबई, ठाण्यातील मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी हा फंडा निवडला असून हा प्रचार बंद होणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणुकीतही भर दुपारी करण्यात येत असलेल्या प्रचारामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. (प्र्रतिनिधी)