शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एकाला महिन्यात सहाच रेल्वे तिकिटे

By admin | Updated: January 30, 2016 04:16 IST

आॅनलाईन तिकिटांतील गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रवाशांना एका महिन्यात आता सहाच

मुंबई : आॅनलाईन तिकिटांतील गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रवाशांना एका महिन्यात आता सहाच तिकिटे काढता येणार आहेत. या नव्या नियमाची अंमलबजावणी १५ फेब्रुवारीपासून केली जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. सध्या एका प्रवाशाकडून महिन्याभरात दहा तिकिटे काढली जातात. मेल-एक्स्प्रेसची आॅनलाईन तिकिटे काढताना मोठ्या प्रमाणात अनधिकृतबरोबरच अधिकृत दलालांकडूनही गैरप्रकार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या एका महिन्यात एका प्रवाशाला दहा तिकिटेच काढण्याचे बंधन आहे. रेल्वेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ९0 टक्के युजर्स हे महिन्याभरात प्रत्येकी सहा तिकिट तर दहा टक्के युजर्स हे महिन्याभरात ६ पेक्षा जास्त तिकिट काढतात. हे पाहता यातील दहा टक्के युजर्स हे तिकिट दलाली करणाऱ्यांमधील असल्याचा अंदाज यातून बांधण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेकडून एका प्रवाशाला महिन्याभरात फक्त सहाच तिकिटे काढण्याचा नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रत्येक प्रवासी प्रत्येक दिवशी आपल्या युजर्स आयडीवरुन फक्त दोन तिकिट (एआरपी-अ‍ॅडव्हान्स रिर्जर्व्हेशन तिकिट)काढू शकणार आहे. तर तत्काळसाठीही हाच नियम असेल. त्याचप्रमाणे सकाळी आठ ते बारा या वेळेत ई-वॉलेट किंवा कॅश कार्डमार्फत आरक्षण करता येणार नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.सध्याची तरतूदसर्व प्रकारचे अधिकृत दलाल पहिल्या अर्धा तासांत तिकिटांचे आरक्षण करु शकतात. यात सकाळी आठ ते ८.३0 या वेळेत जनरल आरक्षणसकाळी दहा ते साडे दहा आणि अकरा ते साडे अकरा या वेळेत एसी आणि नॉन एसीचे तत्काळ आरक्षण करु शकतात.90 टक्के युजर्स हे प्रत्येकी सहा तिकिट तर दहा टक्के युजर्स हे महिन्याभरात ६ पेक्षा जास्त तिकिट काढतात. असे रेल्वेकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात आढळले आहे.