शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 6 पोलीस शहीद

By admin | Updated: June 16, 2017 21:14 IST

दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला चढवला असून, यात 6 पोलीस शहीद झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत जम्मू-काश्मीर, दि. 16 - अनंतनागमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला चढवला असून, यात 6 पोलीस शहीद झाले आहेत. काश्मीरमध्ये लागोपाठ दुस-या दिवशी दहशतवाद्यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा क्रौर्याचे प्रदर्शन करत शहीद पोलिसांच्या मृतदेहांची विटंबना केली आहे. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये एका पोलीस पथकावर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 5 पोलीस शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील अचंबलमधल्या थाजीवारा येथे एका पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला होता. मात्र अधिकृतरीत्या त्याला दुजोरा मिळाला नाही. यापूर्वी कुलगाममधल्या वीरवारमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते.

तर आजच जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीआरपीएफला यश आले असून, यामध्ये लष्कर ए तय्यबाचा डिस्ट्रीक्ट कमांडर जुनैद मट्टूलाही ठार केले होते. मट्टूसह खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव मुझम्मिल असल्याचे सांगण्यात आले आहे. अनंतनाग जिल्ह्यामधील अरवनी गावामध्ये जुनैद आणि त्याच्या दोन साथीदारांना भारतीय सैन्य दल, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करून कोंडीत पकडले होते.  आठ तास चाललेल्या या चकमकीमध्ये जुनैद आणि मुझम्मील ठार झाले, तर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला पकडण्यात आले आहे. जुनैदने मागील वर्षी पोलिसांच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यामध्ये तीन पोलीस मृत्युमुखी पडले होते. जुनैद गेली दोन वर्षे सक्रीय झाल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्यावर दहा लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. गेल्या वर्षापासून भारतीय सैन्याला मिळालेले हे तिसरे यश आहे. बु-हान वानी, त्याचा साथीदार सब्जर अहमद भट यांच्यानंतर मट्टूला मारण्यात यश आले आहे. मट्टूने वयाच्या 18 व्या वर्षी दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता असे सांगण्यात येते. काश्मीर खोऱ्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या 12 वॉंटेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये जुनैदचा समावेश होता.
 
भारतीय लष्कर आणि पोलिसांना लक्ष्य बनवण्यात येण्याच्या दहशतवाद्यांच्या धमकीनंतर दुस-याच दिवशी म्हणजे काल गुरुवारी एक हल्ला करण्यात आला होता. गुरुवारी दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचा-याची हत्या करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यात बुगंग गावातील पोलीस कर्मचारी स्वतःच्या घराबाहेर उभा होता. त्याच वेळी दहशतवाद्यांनी तिथे पोहोचून पोलीस कर्मचा-यावर गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर धमकी देत दहशतवादी फरार झाले. जखमी पोलीस कर्मचा-याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बुधवारी लष्करच्या स्थानिक कमांडरनं व्हिडीओ प्रसिद्ध करत पोलीस कर्मचा-यांना धमकी दिली होती. त्यानं पोलीस वर्दी सोडून दहशतवादी मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. तसेच पोलीस, जवान आणि अधिका-यांना आता लक्ष्य करण्यात येईल, असंही बजावलं होतं. दहशतवाद्यांना पैसे देणे आणि मुजाहिद्दीन, हुर्रियतला साथ देण्याच आवाहन केलं आहे. दहशतवादी संघटन हिजबुल मुजाहिद्दीननेही मंगळवारी दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरत हिज्ब कमांडर सब्जार यांच्या हत्येचा बदला घेतल्याचं सांगितलं आहे.