शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये सहा जवान शहीद

By admin | Updated: February 22, 2016 01:48 IST

श्रीनगरच्या सीमेवरील पाम्पोर येथे एका शासकीय इमारतीत दडून बसलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांसोबत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण चकमकीत रविवारी लष्कराच्या दोन

श्रीनगर : श्रीनगरच्या सीमेवरील पाम्पोर येथे एका शासकीय इमारतीत दडून बसलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांसोबत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण चकमकीत रविवारी लष्कराच्या दोन कॅप्टनसह तीन कमांडर शहीद झाले, तर इमारतीत लपलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या चकमकीतील मृत्युसंख्या सातवर पोहोचली आहे.कॅप्टन पवन कुमार, कॅप्टन तुषार महाजन आणि जवान ओमप्रकाश अशी रविवारच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात लष्कराला यश आले. कॅप्टन पवन कुमार हे हरियाणाचे तर कॅप्टन तुषार महाजन हे उधमपूरचे आहेत. दहशतवाद्यांनी शनिवारी दुपारी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर या इमारतीचा ताबा घेतला होता. या हल्ल्यात दोन जवान आणि एक नागरिक असे तिघे जण ठार आणि नऊ जवान जखमी झाले होते. तत्पूर्वी सुरक्षा दलांनी या इमारतीत अडकलेल्या शंभरावर कर्मचारी व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले होते. हे दहशतवादी शस्त्रसज्ज असल्याने कारवाई आणखी काही काळ चालण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)दोन दिवसांपासून चकमक सुरूचपाम्पोर येथे असलेल्या एंटरप्रीनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नावाच्या या बहुमजली इमारतीत शनिवारी हे दहशतवादी घुसले होते. त्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्कराने कारवाई सुरू केली आहे. इमारतीत तीन ते चार दहशतवादी लपले असल्याचा अंदाज आहे. त्यांच्यासोबत रविवारीही भीषण चकमक उडाली, ज्यात भारतीय लष्कराचे तीन कमांडर शहीद झाले. ही चकमक सुरू असताना या इमारतीत आगही लागली.दुसऱ्या दिवशीही रात्रीपर्यंत चकमक सुरूच होती. सुरक्षा दलांनी या संपूर्ण इमारतीला वेढा घातलेला आहे आणि जवान या इमारतीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. दहशतवाद्यांनी गोळीबारासोबतच सुरक्षा दलांच्या जवानांवर हातबॉम्बही फेकले.