शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मेमध्ये सहा दिवस परदेशात

By admin | Updated: May 6, 2015 00:42 IST

सत्तेवर आल्यापासून परदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या चीन दौऱ्याची घोषणा चिनी सोशल मीडिया ‘वायबो’वर केली असून, आपल्या स्टाईलने चिनी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

तीन देशांचा दौरा : १४ ते १९ मेदरम्यान चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाला भेटबीजिंग : सत्तेवर आल्यापासून परदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या चीन दौऱ्याची घोषणा चिनी सोशल मीडिया ‘वायबो’वर केली असून, आपल्या स्टाईलने चिनी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी १४ ते १९ मे दरम्यान चीन, मंगोलिया व दक्षिण कोरिया अशा तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा १५ वा परदेश दौरा आहे. गेल्या वर्षी २६ मे रोजी सत्तेवर आल्यापासून मोदी यांनी १५ परदेश दौरे केले असून, ते सुमारे ४० दिवस परदेशात राहिले.मोदी यांचे देशांतर्गत दौरेही जास्त असून त्यांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे. ते १२ वेळा महाराष्ट्रात आले असून, जम्मू-काश्मीरला ८ वेळा गेले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा हा वेग पाहता, ते सर्वाधिक दौरे करणारे पंतप्रधान ठरतील, अशी चर्चा आहे. चीनला मी १४ ते १६ मे अशी तीन दिवसांची भेट देत असून, या भेटीत दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील, असे अपेक्षित आहे, असे मोदी यांनी वायबोवर जाहीर केले आहे. मोदी यांची भेट चीनमध्ये प्रथमच अधिकृतपणे जाहीर झाली आहे. मोदी यांचा चीन दौरा चीनचे प्राचीन शहर शियानपासून सुरू होईल. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व त्यांची पत्नी पेंग लियुन त्यांचे स्वागत करतील. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे गेल्यावर्षी अहमदाबाद शहरात जसे स्वागत झाले तसेच स्वागत मोदी यांचे केले जाईल. शियान ही शांक्सी प्रांताची राजधानी असून अध्यक्ष जिनपिंग यांचे घर या शहरात आहे. चीनचे अध्यक्ष बीजिंगखेरीज दुसऱ्या शहरात परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्याची ही दुर्मिळ वेळ आहे. दरम्यान, चीन दौऱ्यानंतर १८ मे रोजी मोदी दक्षिण कोरियाला जाणार आहेत. (वृत्तसंस्था)भारतीय नागरिकांसाठी कार्यक्रम>भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे. पंतप्रधान मोदी १४ ते १६ मे द रम्यान चीन दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते शियान, बीजिंग व शांघाय शहरांना भेट देणार असून, सांस्कृतिक व व्यावसायिक कार्यक्रमात सहभागी होतील, असे या निवेदनात म्हटले आहे. > चीनमधील भारतीय नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार असून, अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर, सिडनीतील आॅलिम्पिक पार्क व कॅनडातील टोरोंटो येथील रिकोह कोलीसियम येथील सभांची पुनरावृत्ती चीनमध्ये होईल असे अपेक्षित आहे.