शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सहा शाखा व्यवस्थापक बडतर्फ जिल्हा बॅँक अपहार: पावणे दोन कोटींच्या रकमांची हेराफेरी

By admin | Updated: January 29, 2016 22:39 IST

जळगाव : जिल्हा बॅँकेच्या चाळीसगाव, भडगाव व पारोळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या सहा शाखांमध्ये झालेल्या अपहार प्रकरणात सहा शाखा व्यवस्थापकांना बडतर्र्फ करण्यात आले आहे. त्यातील कजगाव शाखा वगळता अन्य ठिकाणच्या शाखा व्यवस्थापकांच्या अपहाराच्या रकमांची वसूली करण्यात आल्याची माहिती बॅँकेच्या सूत्रांनी दिली. जिल्हा बॅँकेच्या खेडगाव नंदीचे ता. भडगाव,भोजे चिंचपुरे ता. पाचोरा, ...


जळगाव : जिल्हा बॅँकेच्या चाळीसगाव, भडगाव व पारोळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या सहा शाखांमध्ये झालेल्या अपहार प्रकरणात सहा शाखा व्यवस्थापकांना बडतर्र्फ करण्यात आले आहे. त्यातील कजगाव शाखा वगळता अन्य ठिकाणच्या शाखा व्यवस्थापकांच्या अपहाराच्या रकमांची वसूली करण्यात आल्याची माहिती बॅँकेच्या सूत्रांनी दिली.
जिल्हा बॅँकेच्या खेडगाव नंदीचे ता. भडगाव,भोजे चिंचपुरे ता. पाचोरा, चाळीसगाव शाखा, उंदीरखेडे ता. पारोळा, कोळगाव ता.भडगाव, कजगाव ता.भडगाव या शाखांमध्ये २०१२-१३ व २०१३-१४ या कालावधित सुमारे १ कोटी ७५ लाखांच्या वर अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी हा अपहार केल्याचे लेखा परीक्षणात उघडकीस आले होते.
----

सर्वात मोठा अपहार खेडगाव शाखेत
सहा शाखांमध्ये झालेल्या अपहारात खेडगाव नंदीचे शाखेत सर्वाधिक रकमेचा अपहार झाला आहे. शाखा व्यवस्थापक पंढरीनाथ पाटील याने सुमारे १ कोटी रुपयांची हेराफेरी केली आहे. भोजेे चिंचपूर शाखा व्यवस्थापक किशोर गरूड याने २९ लाख, चाळीसगाव शाखा व्यवस्थापक संदीप देशमुख याने ३८ लाख, उंदीरखेडे शाखा व्ययस्थापक रत्नाकर पाटील याने ४ लाख १० हजार, कोळगाव शाखा व्यवस्थापक जगदीप सपकाळे याने १ लाख ८८ हजार, कजगाव शाखा व्यवस्थापक प्रकाश चौधरी याने ३ लाख ९० हजारांचा अपहार केल्याचे २०१२-१३ व २०१३.१४ च्या लेखा परीक्षणात उघडकीस आले आहे. त्यामुळे या सहा अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

बचत खात्यात हेराफेरी
बॅँकेत बचत खाते असलेल्या खातेदारांच्या रकमा बनावट कागदपत्रे करून काढून घेणे, रकमांमध्ये शून्य वाढवून वाढलेली रक्कम खिशात घालणे असे प्रकार औरंगाबाद येथील ऑडिट कंपनी कैलास असोसिएट्सने उघडकीस आणला आहे. या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट अंकित कैलास अग्रवाल यांनी हा अपहार उघडकीस आणला.
------
सहाजण बडतर्फ
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॅँक प्रशासनाने गंभीर दखल घेत प्रथम वसुलीची प्रक्रिया सुरू केली. त्यात कजगाव शाखा वगळता अन्य शाखेच्या व्यवस्थापकांकडून अपहाराच्या रकमा वसूल करण्यात आल्या असल्याचे बॅँकेच्या सूत्रांनी सांगितले. तसेच या सहा शाखा व्यवस्थापकांना बडतर्फ करण्यात आले आहे.
-----