शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

गरज पडल्यास आमदारांविरुद्ध कडक कारवाई करू सिसोदिया यांनी मांडली भूमिका

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

नवी दिल्ली : गत ४९ दिवसांच्या कार्यकाळातील आपल्या चुकांपासून धडा घेत, आम आदमी पार्टीने यापुढे ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबल्याचे चित्र आहे़ केजरीवाल सरकारमधील भावी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले़ नाहक मुद्दे उपस्थित करणारे वा शिस्तभंग करणाऱ्या आमदारांची यावेळी कुठलीही गय केली जाणार नाही़ प्रसंगी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सिसोदिया म्हणाले़

नवी दिल्ली : गत ४९ दिवसांच्या कार्यकाळातील आपल्या चुकांपासून धडा घेत, आम आदमी पार्टीने यापुढे ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबल्याचे चित्र आहे़ केजरीवाल सरकारमधील भावी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले़ नाहक मुद्दे उपस्थित करणारे वा शिस्तभंग करणाऱ्या आमदारांची यावेळी कुठलीही गय केली जाणार नाही़ प्रसंगी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सिसोदिया म्हणाले़
आज शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते़ गतवेळी पक्षाचे २८ आमदार असताना विनोद कुमार बिन्नी यांच्या बंडखोरीने आम आदमी पार्टीच्या नाकीनऊ आणले होते़ यानंतर काही जण पक्ष सोडून भाजपात जाणार असल्याच्या अफवाही उठल्या होत्या़ आता आपचे ६७ आमदार आहे़ या आमदारांना कसे सांभाळणार? असा प्रश्न केला असता सिसोदिया यांनी उपरोक्त उत्तर दिले़
गतवर्ष आमच्यासाठी कसोटीचे वर्ष होते़ पण आम्ही या कसोटीवर खरे उतरलो आणि म्हणूनच आज आमचे ६७ आमदार आहे़ त्यांना सांभाळताना समस्या येईल, असे आम्हाला वाटत नाही़ पण काहींनी वादग्रस्त मुद्दे उपस्थित केलेच तर आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही़ पक्षाने आमदारांची मोट बांधली आहे़ पक्ष आपल्या आमदारांसाठी काही मापदंड निश्चित करेल, त्याचे पालन होणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले़
काही आमदारांनी अगदी काही महिन्यांपूर्वी पक्षप्रवेश केला आहे़ अशास्थितीत ते आम आदमी पार्टीचे नियम पाळतील, असे कसे गृहित धरता येईल? असे विचारले असता सिसोदिया म्हणाले की, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापासून प्रेरित होऊन ते पक्षात आले आहेत़ त्यामुळे पक्षात भ्रष्टाचाराला थारा नाही, हे ते जाणून आहेत़ याशिवाय पक्षाच्या कसोटीवर ते खरे उतरलेले उमेदवार आहे़ एकंदर पक्ष आपल्या तत्त्वांबाबत कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही़ पक्षशिस्त पाळली जाईल आणि निश्चितपणे आम्ही त्या स्थितीत आहोत़