शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल जोड

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

विनायक देशमुख हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन

विनायक देशमुख हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन
नागपूर :शांतिनगर येथील विनायक देशमुख हायस्कूल येथे आयोजित स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मानसोपचार तज्ज्ञ प्रा. स्वाती धर्माधिकारी यांच्याहस्ते झाले. यावेळी प्राचार्य एम. आर. जोशी, ए. के. देशपांडे उपस्थित होते. संमेलनानिमित्त आयोजित स्पर्धेचे बक्षीस वितरण सुभाष कोटेचा यांच्याहस्ते झाले. यावेळी रवींद्र डोळस, निरंजना रामटेके, धनंजय भिडे, पुरुषोत्तम पंचभाई उपस्थित होते.
अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळा
नागपूर : ओमनगर येथील सार्वजनिक हनुमान देवस्थान पंचकमिटीतर्फे तीन दिवसीय अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळ्यात प्रल्हाद महाराज यांचे गोपालकाल्याचे कीर्तन व भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिंडी सोहळ्यात उज्ज्वल उच्च प्रा. शाळेच्या बाल कलाकारांची चमू सहभागी झाली होती.
राही पब्लिक स्कूलमध्ये श्रद्धांजली कार्यक्रम
नागपूर : पाकिस्तानमधील पेशावर येथे आर्मी स्कूलवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अनेक विद्यार्थी ठार झाले. या निर्दोष चिमुकल्याच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून राही पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शाळेचे अध्यक्ष विजय राऊत, मुख्याध्यापिका अनुराधा हेडाऊ आदी उपस्थित होते.
नायलॉन मांजावर बंदी आणा
नागपूर : पतंग उत्सव जवळ आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नायलॉन मांजाचा वापर होणार आहे. हा मांजा अतिशय घातक असून, मांजामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचे अपघात झाले आहे. पशुपक्षीही मांज्यामुळे जखमी झाले आहे. जनतेच्या हितासाठी नायलॉन मांजावर बंदी आणावी, अशी मागणी नरेंद्र मोदी विचार मंचतर्फे करण्यात आली आहे.
स्काऊट गाईड शिबिर
नागपूर : बाल मंदिर संस्थाद्वारा संचालित लेफ्टनंट कर्नल वसंत धुंडिराज परांजपे शाळेचा स्काऊट गाईड्सचे शिबिर बजाजनगर येथे पार पडले. या शिबिरात चित्रकला, वर्ग सजावट स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्याध्यापिका सावतकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या संचालिका डॉ. रंजना पारधी उपस्थित होत्या.
ड्रीमलॅण्ड स्कूलचे स्नेहसंमेलन
नागपूर : काचोरे पाटीलनगरातील ड्रीमलॅण्ड स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलनाचे उद्घाटन रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांच्याहस्ते झाले. यावेळी रवि मल्होत्रा, मीरा मल्होत्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मा. गो. वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.