सिंगल - मस्ट
By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST
बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळाचा स्नेहमेळावा २३ ला
सिंगल - मस्ट
बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळाचा स्नेहमेळावा २३ लानागपुर : बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ, नागपूर हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे मंडळ आहे. मागास बुलडाणा जिल्ह्यासाठी तनमनधनाने सहभाग देणारी संस्था आहे. या संस्थेचा वार्षिक स्नेहमेळावा २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गुरुनानक भवन, अंबाझरी बायपास रोड येथे होणार आहे. मेळाव्यात शक्तीभाऊ संचेती जिल्हा गौरव पुरस्कार, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. मंडळाने बुलडाणा जिल्ह्याकडे सरकारने सकारात्मक दृष्टीने बघावे यासाठी काही मागण्या केंद्र व राज्य सरकारकडे केल्या आहे.