सिंगल.. कोदामेंढी
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
फोटो...
सिंगल.. कोदामेंढी
फोटो...चुकीच्या उपचारामुळे इसमाचा मृत्यूकोदामेंढी : चुकीच्या औषधोपचारामुळे इसमाचा मृत्यू झाल्याची घटना नजीकच्या नांदगाव येथे बुधवारी घडली. रामचंद्र भोबळूजी पडोळे (५५) असे मृताचे नाव आहे. रामचंद्र पडोळे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी अरोली परिसरातील एका खासगी दवाखान्यात उपचार घेतले. दरम्यान, त्यांच्या शरीरात विषबाधा निर्माण झाल्याने त्यांना नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पडोळे यांना चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन लावण्यात आल्यामुळे त्यांच्या शरीरावर इन्फेक्शन झाले असल्याची माहिती नागपुरातील डॉक्टरांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर नांदगाव स्मशानभूमीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे. सदर घटनेमुळे परिसरातील नागरिकांत संतप्त भावना व्यक्त होत आहे. या घटनेबाबत तक्रार झाली नाही. ग्रामीण भागातील अशा घटनांच्या तक्रारी होत नसल्याने खेड्यापाड्यातील डॉक्टरांचे चांगलेच फावते. (वार्ताहर)