सिंगल
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
टॉवरग्रस्तांच्या समस्येसंदर्भात ऊर्जामंत्र्यांना निवेदन
सिंगल
टॉवरग्रस्तांच्या समस्येसंदर्भात ऊर्जामंत्र्यांना निवेदननागपूर : महाराष्ट्रात ११ कंपन्यांकडून उच्चदाबाच्या वीज वाहिनीचे काम सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची शेती गेलेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. कंपन्या नुकसानीचा पंचनामा कृषी अधिकाऱ्यांकडून न करता स्वत:च करीत आहेत. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करावे, शेतीच्या सातबारावर टॉवरची नोंद घ्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसेचे मिलिंद पाटील यांनी ऊर्जामंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेचे अनिल नागरे, संजय चांदोरे, अनिल पटेल उपस्थित होते.