सिंगल
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
एचईआरडी फाऊंडेशनतर्फे रोजगार मेळावा
सिंगल
एचईआरडी फाऊंडेशनतर्फे रोजगार मेळावा नागपूर : एचईआरडी फाऊंडेशन व सेंट्रल इन्स्टट्यिूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटच्या संयुक्त विद्यमाने ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन नागपूर व पारशिवनी येथे करण्यात आले आहे. यात पदवी व त्यापुढील शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी ३१ जानेवारीला नागपुरातील पावनभूमी ग्राऊंड, वर्धा रोड येथे आयोजित मेळाव्यात संधी मिळणार आहे. तर १ फेब्रुवारीला महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय, पारशिवनी येथील मेळाव्यात १० व १२ वी उमेदवारांना रोजगाराच्या संधी दिल्या जाईल. मेळाव्याला ३५ पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग आहे. यात ५ हजार जागा रिक्त आहेत. या संधीचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एचईआरडी फाऊंडेशनचे डॉ. अमोल देशमुख यांनी केले आहे.