शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल...

By admin | Updated: August 12, 2015 00:35 IST

पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण बेदम मारहाण : निर्जन ठिकाणी फेकलेनागपूर : पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून त्याला जखमी अवस्थेत निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आल्याची घटना उघड झाल्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. स्वानंद शिरीश वऱ्हाडपांडे (वय १७) असे त्याचे नाव असून, तो बिंझाणी महाविद्यालयात १२ वीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील ...


पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण
बेदम मारहाण : निर्जन ठिकाणी फेकले
नागपूर : पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून त्याला जखमी अवस्थेत निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आल्याची घटना उघड झाल्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.
स्वानंद शिरीश वऱ्हाडपांडे (वय १७) असे त्याचे नाव असून, तो बिंझाणी महाविद्यालयात १२ वीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील पोलीस विभागात फोटोग्राफर आहेत.
मंगळवारी दुपारी महाविद्यालय संपवून तो एका मित्राला सोडण्यासाठी मानेवाड्यात गेला. सिध्देश्वर मंगल कार्यालयाजवळ मित्राला सोडल्यानंतर तो बेपत्ता झाला. दरम्यान, दुपारचे ३ वाजले तरी तो परतला नाही, त्यामुळे आईवडिलांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. तो बंद असल्यामुळे त्याच्या मित्रांकडे चौकशी करण्यात आली. मानेवाड्यातील मित्राने स्वानंद आपल्याला सोडून दुपारी १२ च्या सुमारास गेल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांमध्ये घबराट निर्माण झाली. त्याची शोधाशोध सुरू असतानाच दुपारी ४ च्या सुमारास उमरेड टोल नाक्याजवळ शेतात एक युवक जखमी अवस्थेत आढळला. ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली. स्वानंदची शोधाशोध सुरू असतानाच जखमी युवकाचे वर्णन त्याच्याशी मिळतेजुळते असल्यामुळे शिरीश वऱ्हाडपांडे घटनास्थळी पोहचले. तो स्वानंदच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला सक्करदरातील इस्पितळात दाखल करण्यात आले. स्वानंदचे अपहरण करून त्याला जखमी करणारे कोण, त्याबाबत स्वानंदला काहीही आठवत नाही. उशिरा रात्रीपर्यंत या अपहरण प्रकरणाचा खुलासा झालेला नव्हता.
---